• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘….अशा लोकांमुळे पवित्र अशा वारकरी संप्रदायाची बदनामी!’,  विकास लवांडे शाईफेक प्रकरणावर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 9, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
‘….अशा लोकांमुळे पवित्र अशा वारकरी संप्रदायाची बदनामी!’,  विकास लवांडे शाईफेक प्रकरणावर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया

जळगाव, 9 मे: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. विकास लवांडे यांच्या अंगावर शाईच्या बाटल्या ओतण्यात आल्या. या शाईफेकीचा व्हिडीओ समोर आला असून तो सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

शाईफेक प्रकरणी दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल –

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते विकास लवांडे यांनी काही वारकरी आणि कीर्तनकारांबाबत केलेल्या वक्तव्यांवरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर हवेली तालुक्यात आज त्यांच्या अंगावर शाईफेक करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.  दरम्यान, विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करणारे संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांच्यावर लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांच्यासह दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया –

विकास लवांडे शाईफेक प्रकरणावर रोहिणी खडसेंनी म्हटलंय की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आणि संघटक सचिव विकास लवांडे हे तालुका हवेली येथे एका प्रवचनासाठी जात असताना संग्राम भंडारे आणि त्यांच्या काही भाडोत्री गुंडांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुमारे १० ते १५ जणांनी एकत्र येत लवांडे यांना मारहाण केली असून, हल्लेखोरांपैकी दोघा-तिघांकडे पिस्तूलही असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत गृह विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी.

वारकरी संप्रदायाची बदनामी होतेय –  रोहिणी खडसे

विचारांची लढाई ही विचारांनीच लढली गेली पाहिजे. मात्र, वारकरी संप्रदायात काही अविचारी लोक घुसले असून ते जाणीवपूर्वक समाजात विष पेरण्याचे काम करत आहेत. आम्ही यापूर्वीही या विषयावर वारंवार भाष्य केले आहे. विकास लवांडे यांच्यावर झालेला हल्ला हा त्याचाच सबळ पुरावा आहे. अशा प्रवृत्तीमुळे पवित्र वारकरी संप्रदायाची बदनामी होत असून, हे वेळीच थांबवणे गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: Breaking! ममती बॅनर्जी यांचे एकेकाळचे ‘राईट हँड’ अन् आज थेट बनले पश्चिम बंगालचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री; सुवेंदू अधिकारी यांनी घेतली CM पदाची शपथ

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newsrohini khadsesangram bhandaresuvarna khandesh livevikas lavandevikas lavande ink-throwing incident

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश, आता नेमक्या कोणत्या सवलती मिळणार?

मोठी बातमी! राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश, आता नेमक्या कोणत्या सवलती मिळणार?

September 26, 2026
“दुष्काळाचा जीआर निघालाच आहे; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे सुरू, नुकसानभरपाई तातडीने देणार!” – मंत्री गिरीश महाजन

“दुष्काळाचा जीआर निघालाच आहे; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे सुरू, नुकसानभरपाई तातडीने देणार!” – मंत्री गिरीश महाजन

September 26, 2026
VIDEO | “दुष्काळ खूप मोठा; पिके देखील मोठ्या प्रमाणात करपलेली आहेत, यामुळे…….!”, दुष्काळाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

VIDEO | “दुष्काळ खूप मोठा; पिके देखील मोठ्या प्रमाणात करपलेली आहेत, यामुळे…….!”, दुष्काळाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

September 25, 2026
दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांना ‘समर्थ दिव्यांग सामाजिक संस्था’ व ‘प्रहार दिव्यांग संघ’ पाचोरा-भडगाव तालुका यांच्या वतीने निवेदन

दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांना ‘समर्थ दिव्यांग सामाजिक संस्था’ व ‘प्रहार दिव्यांग संघ’ पाचोरा-भडगाव तालुका यांच्या वतीने निवेदन

September 25, 2026
पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार: आमदार किशोर आप्पा पाटील

पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार: आमदार किशोर आप्पा पाटील

September 24, 2026
“सत्ता महत्त्वाची असली तरी त्यापेक्षा सत्य महत्त्वाचं; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची भूमिका कायम!” – आमदार बच्चू कडू

“सत्ता महत्त्वाची असली तरी त्यापेक्षा सत्य महत्त्वाचं; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची भूमिका कायम!” – आमदार बच्चू कडू

September 24, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page