• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ब्रेकिंग

Breaking! ममती बॅनर्जी यांचे एकेकाळचे ‘राईट हँड’ अन् आज थेट बनले पश्चिम बंगालचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री; सुवेंदू अधिकारी यांनी घेतली CM पदाची शपथ

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 9, 2026
in ब्रेकिंग, ताज्या बातम्या, देश-विदेश
Breaking! ममती बॅनर्जी यांचे एकेकाळचे ‘राईट हँड’ अन् आज थेट बनले पश्चिम बंगालचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री; सुवेंदू अधिकारी यांनी घेतली CM पदाची शपथ

कोलकाता, 9 मे: पश्चिम बंगालमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक कामगिरी करत ऐतिहासिक बहुमत प्राप्त केले. यानंतर बंगालमधील भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांची भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी काल निवड करण्यात आली. दरम्यान, मुख्यमंत्रीपदाच्या शपथग्रहण समारंभ पार पडला. या समारंभात सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली घेतली. दरम्यान, ममती बॅनर्जी यांचे एकेकाळचे ‘राईट हँड’ अर्थातच अत्यंत विश्वासू सहकारी मानले जाणारे सुवेंदू अधिकारी हे बंगालचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.

सुवेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ –

पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी यांनी आज 9 मे रोजी शपथ घेतली. कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल आर. एन. रवी यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली असून सुवेंदू अधिकारी हे स्वातंत्र्यानंतरचे पश्चिम बंगालचे पहिले भाजपचे मुख्यमंत्री बनले आहेत. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, यांच्यासह केंद्रीय मंत्रीमंडळातील मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री तसेच पश्चिम बंगालमधील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.

सुवेंदू अधिकारी यांची राजकीय कारकीर्द –
सुवेंदू अधिकारी यांचा जन्म १५ डिसेंबर १९७० रोजी झाला असून रवींद्र भारती विद्यापीठातून २०११ मध्ये एम.ए. ची पदवी मिळवली. त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे देखील राजकारणातील एक मोठे नाव असून ते केंद्रात मंत्रीही राहिलेले आहेत. दरम्यान, वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सुवेंदु यांनी तरुण वयातच राजकारणात प्रवेश करत 1995 साली ते पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले.

२००६ मध्ये सुवेंदू अधिकारी पहिल्यांदाच आमदार –

यानंतर 1998 साली तृणमूल काँग्रेसच्या स्थापनेपासून ते ममता बॅनर्जी यांचे खंदा समर्थक म्हणून कार्यरत राहिले. आणि २००६ मध्ये सुवेंदू अधिकारी पहिल्यांदाच आमदार झाले. यासोबतच, २००९ व २०१४ मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले. असे असताना नंदीग्राममधील भूमी अधिग्रहण विरोधी आंदोलनाने ते राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. या आंदोलनातील त्यांच्या भूमिकेमुळे तृणमूलला बंगालमध्ये सत्ता मिळाली.

तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी अन् भाजपमध्ये प्रवेश –

सुवेंदू अधिकारी यांनी 2020 मध्ये त्यांनी तृणमूल सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षातील अंतर्गत मतभेदांमुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे नेहमीच बोलले गेले. भाजपममध्ये प्रवेश केल्यानंतर 2021 साली अधिकारी यांना राज्य विधानसभेत विरोधी पक्षनेत्याचा कारभार सोपविण्यात आला. भाजपमध्ये आल्यानंतर मागील सहा वर्षांच्या कालावधीत त्यांनी पक्षाला बंगालमध्ये एक मजबूत स्थान मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली.

गेल्या 30 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत राज्यातील सर्वोच्च पदापर्यंत मजल –

ऐतिहासिक विजय प्राप्त केल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पहिला मुख्यमंत्री कोण होणार याची सर्वीकडे उत्सुकता लागली होती. या पार्श्वभूमीवर काल ८ मे २०२६ रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कोलकाता येथे झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत सुवेंदू अधिकारी यांची पश्चिम बंगाल भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या 30 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत सुवेंदू अधिकारी हे राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे ते भाजपचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.

‘अशी’ आहे निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी –

  • भाजप – 207
  • तृणमूल काँग्रेस – 80
  • काँग्रेस – 02
  • डावे पक्ष – 02
  • इतर – 02
  • एकूण जागा – 293

Pachora News: “पीक कर्ज मिळालं… खात्यात पैसे आले; पण एटीएममध्ये कॅशच नाही!”, शेतकरी सेनेचे बँकांना निवेदन

बातमी शेअर करा !
Share
Tags: suvarna khandesh livesuvendu adhikariwest bengal cm oath taking ceremonywest bengal's first bjp cm

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Breaking! ममती बॅनर्जी यांचे एकेकाळचे ‘राईट हँड’ अन् आज थेट बनले पश्चिम बंगालचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री; सुवेंदू अधिकारी यांनी घेतली CM पदाची शपथ

Breaking! ममती बॅनर्जी यांचे एकेकाळचे ‘राईट हँड’ अन् आज थेट बनले पश्चिम बंगालचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री; सुवेंदू अधिकारी यांनी घेतली CM पदाची शपथ

May 9, 2026
नसरापूर येथील घटनेच्या निषेधार्थ पाचोरा तालुका शिवसेना महिला आघाडीच्यावतीने प्रशासनाला निवेदन; आरोपीस फाशीच्या शिक्षेची मागणी

नसरापूर येथील घटनेच्या निषेधार्थ पाचोरा तालुका शिवसेना महिला आघाडीच्यावतीने प्रशासनाला निवेदन; आरोपीस फाशीच्या शिक्षेची मागणी

May 8, 2026
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल आज जाहीर होणार; निकाल पाहण्यासाठी ‘या’ आहेत पाच अधिकृत वेबसाईट

SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल आज जाहीर होणार; निकाल पाहण्यासाठी ‘या’ आहेत पाच अधिकृत वेबसाईट

May 8, 2026
आजच्या निकालात तीन राज्यांत भाजपची सत्ता; तमिळनाडूत विजय थलपती ठरला किंगमेकर; 5 राज्यांचे निकाल निकालाची A to Z अपडेट

आजच्या निकालात तीन राज्यांत भाजपची सत्ता; तमिळनाडूत विजय थलपती ठरला किंगमेकर; 5 राज्यांचे निकाल निकालाची A to Z अपडेट

May 4, 2026
Election Results 2026: देशातील 5 राज्यांसह बारामती, राहुरी पोटनिवडणुकीचा आज निकाल, मतमोजणीला सुरूवात

Election Results 2026: देशातील 5 राज्यांसह बारामती, राहुरी पोटनिवडणुकीचा आज निकाल, मतमोजणीला सुरूवात

May 4, 2026
नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

May 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page