• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

एरंडोल परिसरातील ट्रॅक्टर चोरी टोळीचा जळगाव LCB ने केला पर्दाफाश; दोन ट्रॅक्टर जप्त, दोघे ताब्यात

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 17, 2026
in जळगाव जिल्हा, एरंडोल, क्राईम, ताज्या बातम्या
एरंडोल परिसरातील ट्रॅक्टर चोरी टोळीचा जळगाव LCB ने केला पर्दाफाश; दोन ट्रॅक्टर जप्त, दोघे ताब्यात

जळगाव, 17 मे: जळगाव जिल्ह्यातील एरंडोल परिसरात ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून, दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत एरंडोल पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांतील तब्बल 3 लाख 25 हजार रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आले आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी एक विधीसंघर्षग्रस्त बालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

काय आहे संपुर्ण बातमी? –

एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 44/2026 आणि 84/2026 अंतर्गत ट्रॅक्टर चोरीचे सलग गुन्हे दाखल झाले होते. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार करून गुन्ह्यांचा तातडीने छडा लावण्याचे आदेश दिले. पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे विखरण (ता. एरंडोल) येथील विकी देवरे आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेत चौकशी केली.

चौकशीदरम्यान त्यांनी हे दोन्ही गुन्हे गणेश भिकन गोसावी व प्रवीण भाईदास कोळी (दोघे रा. विखरण, ता. एरंडोल) यांच्या साथीने केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेले दोन ट्रॅक्टर जप्त केले असून, फरार असलेल्या इतर दोन आरोपींचा कसून शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.

सदरची कार्यवाही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वातील पथकातील पीएसआय जितेंद्र वल्टे, हेकॉ. संदीप रमेश पाटील, हेकॉ. प्रवीण जनार्दन मांडोळे, हेकॉ. हरीलाल लक्ष्मण पाटील, पोकॉ. राहुल नथू कोळी, हेकॉ. संदीप रमेश पाटील, हेकॉ. महेश मुरलीधर पाटील, पोकॉ. सागर गुलाब पाटील, पोकॉ. भूषण जगदीश शेलार, चापोशि बाबासाहेब पाटील या पथकाने उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

हेही वाचा: उत्तर महाराष्ट्रासाठी ‘गेमचेंजर’ ठरणार नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प; तब्बल 4 हजार 116 कोटींच्या कामाला सुरुवात होणार

बातमी शेअर करा !
Share
Tags: arrestedjalgaon lcbjalgaon policemarathi newssuvarna khandesh livetractor theft gang

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा-भडगाव मतदारसंघातील वीज समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उद्या १३ जुलैला बैठक;  नागरिकांच्या तक्रारींवर होणार थेट चर्चा

पाचोरा-भडगाव मतदारसंघातील वीज समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उद्या १३ जुलैला बैठक;  नागरिकांच्या तक्रारींवर होणार थेट चर्चा

July 12, 2026
VIDEO | ‘तणनाशकाचा परिणामच झाला नाही’; नांद्रा येथील शेतकऱ्याची पाचोरा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

VIDEO | ‘तणनाशकाचा परिणामच झाला नाही’; नांद्रा येथील शेतकऱ्याची पाचोरा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

July 11, 2026
सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्रासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्रासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

July 10, 2026
पावसाळी अधिवेशनाचा समारोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा

पावसाळी अधिवेशनाचा समारोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा

July 10, 2026
महाराजस्व अभियानांतर्गत प्रत्येक मतदारसंघात महाशिबिराचे आयोजन; लाखो कुटुंबांना मिळणार थेट लाभ – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महाराजस्व अभियानांतर्गत प्रत्येक मतदारसंघात महाशिबिराचे आयोजन; लाखो कुटुंबांना मिळणार थेट लाभ – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

July 10, 2026
आदिवासींना हक्काचा सातबारा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

आदिवासींना हक्काचा सातबारा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

July 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page