• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

एमआयडीसी विस्तारासह रोजगारनिर्मितीवर भर; उद्योग मित्र समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 3, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
एमआयडीसी विस्तारासह रोजगारनिर्मितीवर भर; उद्योग मित्र समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

जळगाव, 3 जून: जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, प्रलंबित प्रश्नांचे निराकरण आणि स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीस विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत जळगाव जिल्ह्यातील विस्तारित एमआयडीसीसाठी कुसुंबा, चिंचोली आणि पिंपळे परिसरातील भूसंपादन प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. एमआयडीसी क्षेत्रात फायर स्टेशन उभारणीसाठी आवश्यक अंदाजपत्रकीय आराखड्याच्या मंजुरीसंदर्भात पाठपुरावा करण्याबाबत चर्चा झाली. तसेच कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) रुग्णालयासाठी एमआयडीसीकडून जागा हस्तांतरण व बांधकामाच्या कामांबाबतही विचारविनिमय करण्यात आला.

ऊर्जा व पायाभूत सुविधांच्या दृष्टीने एमआयडीसीकडून महावितरणला दोन ठिकाणी सबस्टेशनसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. ट्रक टर्मिनलच्या प्रलंबित बांधकामाचा विषयाबाबतही चर्चा करण्यात आली. अमळनेर येथील उद्योगांच्या रस्ता व पाणीपुरवठ्याशी संबंधित अडचणी तातडीने सोडविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

जळगाव शहरातील काशीनाथ चौफुली ते एम-सेक्टर या मार्गाच्या विकासासह बाह्यवळण रस्त्याचे अंदाजपत्रक तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच महानगरपालिका हद्दीत महावितरणसाठी दोन जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भातही सकारात्मक विचार करण्यात आला.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या माध्यमातून रोजगार मेळावे आयोजित केले जाणार असून त्यात एमआयडीसीतील उद्योग व औद्योगिक संघटनांचा सहभाग राहणार आहे.

जिल्ह्यात उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी वीज, रस्ता, पाणी आणि सुरक्षा यांसारख्या मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी श्री. घुगे यांनी यावेळी सांगितले. प्रशासन आणि उद्योजक यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी करून विकासकामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. स्थानिक रोजगारनिर्मिती आणि औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहनही रोहन घुगे यांनी केले.

हेही वाचा: शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी, ‘असे’ आहेत कर्जमाफी योजनेचे प्रमुख निकष

बातमी शेअर करा !
Share
Tags: ias rohan ghugejalgaon newssuvarna khandesh liveudyog mitraudyog mitra committee meeting

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एमआयडीसी विस्तारासह रोजगारनिर्मितीवर भर; उद्योग मित्र समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

एमआयडीसी विस्तारासह रोजगारनिर्मितीवर भर; उद्योग मित्र समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

June 3, 2026
शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी, ‘असे’ आहेत कर्जमाफी योजनेचे प्रमुख निकष

शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी, ‘असे’ आहेत कर्जमाफी योजनेचे प्रमुख निकष

June 3, 2026
सुरतमध्ये बस अपघात: 7 जणांचा दुर्दैवी अंत; मदतीसाठी जळगावचे पथक रवाना, एसटी महामंडळाकडून आर्थिक मदतीची घोषणा

सुरतमध्ये बस अपघात: 7 जणांचा दुर्दैवी अंत; मदतीसाठी जळगावचे पथक रवाना, एसटी महामंडळाकडून आर्थिक मदतीची घोषणा

June 3, 2026
78 वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अखंड पोहोचवली सेवा; एसटीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

78 वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अखंड पोहोचवली सेवा; एसटीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

June 2, 2026
जळगाव विधानपरिषद निवडणूक: शेवटच्या दिवशी 16 अर्ज दाखल, महायुती-महाविकास आघाडीत बंडखोरी; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर!

जळगाव विधानपरिषद निवडणूक: शेवटच्या दिवशी 16 अर्ज दाखल, महायुती-महाविकास आघाडीत बंडखोरी; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर!

June 1, 2026
जळगाव विधानपरिषद: भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी; इच्छुकांचा हिरमोड, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

जळगाव विधानपरिषद: भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी; इच्छुकांचा हिरमोड, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

June 1, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page