• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

VIDEO | भोकर SBI बँक दरोडा प्रकरण; कारागृहातून बडतर्फ पीएसआयने रचला कट, 36 कोटी 48 लाखांच्या मुद्देमालासह चार आरोपींना अटक

पोलील अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची पत्रकार परिषदेत माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 2, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम, जळगाव शहर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
VIDEO | भोकर SBI बँक दरोडा प्रकरण; कारागृहातून बडतर्फ पीएसआयने रचला कट, 36 कोटी 48 लाखांच्या मुद्देमालासह चार आरोपींना अटक

जळगाव, 1 नोव्हेंबर: जळगाव तालुक्यातील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) शाखेवर शनिवारी (दि. ३१ ऑक्टोबर) भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. हेल्मेट आणि मास्क घालून आलेल्या चार दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत सुमारे २७ किलो सोने आणि १२ लाख २६ हजार ५०० रुपयांची रोकड लुटली. लुटलेल्या सोन्याची किंमत ३६ कोटी ३६ लाख २३ हजार रुपये असून, रोख रकमेसह एकूण ३६ कोटी ४८ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल आहे.

दरम्यान, पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने नाकाबंदी करत अवघ्या काही तासांत चारही आरोपींना संपूर्ण मुद्देमालासह अटक केली. या दरोड्याचा कट एका बडतर्फ पोलीस उपनिरीक्षकाने कारागृहात असतानाच रचल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आज 1 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिली.

भोकरच्या एसबीआय बँकेच्या शाखेत दरोड्याची घटना –

भोकर येथील मुख्य रस्त्यालगत असलेल्या SBI बँकेच्या शाखेत ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी २.४५ ते ३.१५ वाजेच्या दरम्यान चार अनोळखी व्यक्तींनी प्रवेश केला. डोक्यावर हेल्मेट आणि चेहऱ्यावर मास्क अथवा रुमाल बांधलेल्या या आरोपींकडे बंदूक, धारदार चाकू आणि लाकडी दांडका होता. त्यांनी शाखा व्यवस्थापक जयेश दगडू राणे, कॅशियर रणजित मराठे यांच्यासह बँकेतील इतर कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली.

सुरक्षा रक्षक संदीप कोळी यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपी शंकर जासक याने त्यांच्यावर गोळी झाडली. त्यानंतर आरोपींनी स्ट्राँग रूममधील लॉकरमधून १२ लाख २६ हजार ५०० रुपयांची रोकड आणि तारण ठेवलेले सोन्याचे दागिने ८७१ बॅगमध्ये भरून पोबारा केला.

पोलिसांची अवघ्या काही तासांत कारवाई –

घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. भोकर येथील महिला पोलीस पाटलांचे सासरे संभाजी पवार यांनी दुपारी ३.१७ वाजता पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस पथकाने नियंत्रण कक्षाला सतर्क करत परिसरातील विविध मार्गांवर नाकाबंदी केली. नांद्रा बीटचे पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने संशयितांचा शोध सुरू करण्यात आला. डिकसाई परिसरातील नाकाबंदीदरम्यान अंकुश तुळशीराम पवार (चव्हाण) आणि अंकुश श्रावण चव्हाण या दोघांना लुटलेल्या मुद्देमालाच्या बॅगेसह पकडण्यात आले. त्यांच्या चौकशीतून अन्य दोन आरोपी धरणगावच्या दिशेने पळाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार धरणगाव पोलिसांना सतर्क करण्यात आले. पोलीस निरीक्षक रमाकांत गायकवाड यांच्या पथकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने नाकाबंदी करून गजानन राजेंद्र पवार आणि शंकर रमेश जासक यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले.

पोलिसांनी अटक केलेले चारही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले आहे. अंकुश तुळशीराम पवार याच्याविरुद्ध मुक्ताईनगर आणि जामनेर पोलीस ठाण्यांत दरोड्याच्या तयारीसह जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. गजानन राजेंद्र पवार याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद आहे. तर शंकर रमेश जासक याच्याविरुद्ध शनीपेठ पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडूनही त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याशिवाय बडतर्फ पोलीस उपनिरीक्षकाने कारागृहात असतानाच या दरोड्याचा कट आखल्याची बाबही पोलीस तपासातून समोर आली आहे.

मुद्देमालासह चारही आरोपी पोलिसांना अटक –

या प्रकरणी पोलिसांनी अंकुश तुळशीराम पवार (चव्हाण, वय २५, रा. खापरखेडा, ता. खकनार, जि. बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश), गजानन राजेंद्र पवार (वय ३२, रा. न्यायडोंगरी, ता. नांदगाव, जि. नाशिक),  शंकर रमेश जासक (वय ४२, रा. मन्यारखेडा, ता. जि. जळगाव, खेडदेवी रोड) आणि अंकुश श्रावण चव्हाण (वय ३०, रा. रामदेववाडी, ता. जि. जळगाव) या चार आरोपींना अटक केली आहे.  जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), १०९ (१), १२७ (२), ११५ (२), ३५१ (२), ३५१ (३), ३५२, ३ (५) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ३/२५ आणि ३/२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर धडक व कौतुकास्पद कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पभारी अधिकारी राहुल गायकवाड, जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, एपीआय नयन पाटील धरणगाव पोस्टेचे प्रभारी अधिकारी, उमाकांत गायकवाड पोऊनि बडगुजर स्थागुशा चे पोऊनि जितेंद् वाल्टे, पोऊनि स.फौ. अतुल वंजारी, जळगाव तालुका पोस्टेचे एएसाय सुनिल पाटील, पोकॉ प्रदीप राजपूत, पोकॉ प्रवीण पाटील, पोकॉ दीपक चौधरी, पोकॉ दिनेश चव्हाण, पोकॉ नरेंद्र पाटील, पोकॉ आशीष चौधरी, पोकॉ गुलाब माळी, पोकॉ प्रवीण कोळी, पोकॉ प्रशांत ठाकूर, पोकॉ मिलींद सपकाळे, पोकॉ दिपक देवरे, पोकॉ गणेश पाटील, पोकॉ तुषार जोशी, चालक अशोक पाटील, बापू कोळी व त्यांच्या पथकाने व धरणगाव पोस्टेचे पोकॉ सत्यवान पवार, पोकॉ मनोज पाटील व ग्रामस्थ सागर, कोळी, भगवान कोळी, चेतन पाटील, बन्सी पाटील यशस्वीरीत्या पार पाडली आहे

VIDEO | लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर; जळगाव जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ऋषिकेश काळे यांनी महत्त्वाची माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhokar sbi bank robbery casejalgaon newsjalgaon sp shrikant dhivaremarathi newssbi bank robbery casesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora News: पाचोरा येथे विज्ञान प्रदर्शनात एस.एस.एम.एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची चमकदार कामगिरी

Pachora News: पाचोरा येथे विज्ञान प्रदर्शनात एस.एस.एम.एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची चमकदार कामगिरी

November 2, 2026
VIDEO | भोकर SBI बँक दरोडा प्रकरण; कारागृहातून बडतर्फ पीएसआयने रचला कट, 36 कोटी 48 लाखांच्या मुद्देमालासह चार आरोपींना अटक

VIDEO | भोकर SBI बँक दरोडा प्रकरण; कारागृहातून बडतर्फ पीएसआयने रचला कट, 36 कोटी 48 लाखांच्या मुद्देमालासह चार आरोपींना अटक

November 2, 2026
लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक! बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक! बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन

October 30, 2026
“वडिलांचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी, शेतकऱ्यांसाठी उत्तम काम करणार”, JDCC बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर सुमित पाटील यांचा निर्धार

“वडिलांचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी, शेतकऱ्यांसाठी उत्तम काम करणार”, JDCC बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर सुमित पाटील यांचा निर्धार

October 29, 2026
धानवड ग्रामपंचायतीला कुलूप, ग्रामपंचायत अधिकारीही गैरहजर; जळगावच्या ZP CEO करिश्मा नायर यांनी केली थेट निलंबनाची कारवाई

धानवड ग्रामपंचायतीला कुलूप, ग्रामपंचायत अधिकारीही गैरहजर; जळगावच्या ZP CEO करिश्मा नायर यांनी केली थेट निलंबनाची कारवाई

October 29, 2026
पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन; दुष्काळग्रस्त 305 तालुक्यांत पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करण्याचे आवाहन

पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन; दुष्काळग्रस्त 305 तालुक्यांत पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करण्याचे आवाहन

October 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page