• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home Uncategorized

जळगाव विधान परिषद निवडणूक: रेश्मा काळे यांची माघार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीनंतर सुटला तिढा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 13, 2026
in Uncategorized
जळगाव विधान परिषद निवडणूक: रेश्मा काळे यांची माघार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीनंतर सुटला तिढा

जळगाव, 13 जून: जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोरील बंडखोरीचा पेच अखेर मिटला आहे. शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी आपली उमेदवारी मागे घेत महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेदांवर पडदा पडला असून भाजप आणि महायुतीला मोठा दिलासा मिळाला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट –

रेश्मा काळे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सुरुवातीला कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतल्याने महायुतीच्या नेत्यांची चिंता वाढली होती. मात्र, काल शुक्रवारी मुंबई येथे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर पक्षादेशाचे पालन करत निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.

दरम्यान, माघारीच्या निर्णयापूर्वी रेश्मा काळे काही तास ‘नॉट रिचेबल’ झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. त्या जळगावबाहेर गेल्याच्या तसेच देवदर्शनासाठी रवाना झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह महायुतीतील वरिष्ठ नेतेही बंडखोरी शांत करण्यासाठी प्रयत्नशील होते. अखेर मुंबईतील बैठकीनंतर या सर्व चर्चांवर पूर्णविराम मिळाला.

प्रचार थांबवत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा –

माघारीची घोषणा करताना रेश्मा काळे म्हणाल्या, “मी आमचे प्रमुख नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेतली. त्यांच्या आदेशाचे पालन करून मी महायुतीला पाठिंबा देत आहे. आजपासून माझा सर्व प्रचार थांबवत आहे.”

नाशिक विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरीचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर महायुतीचे लक्ष जळगावच्या निवडणुकीकडे लागले होते. रेश्मा काळे यांच्या माघारीमुळे महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्यासमोरच्या अडचणी कमी झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार शरद तायडे तसेच अपक्ष उमेदवार अनिल चौधरी हे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीसाठी येत्या १८ जून रोजी मतदान होणार असून आता निवडणुकीतील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: PM नरेंद्र मोदींनी तोडला पंडित नेहरूंचा विक्रम; बनले सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjpjalgaon newsjalgaon vidhanparishad election 2026reshma kalereshma kale withdrawsshivsena

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

June 13, 2026
‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

June 13, 2026
गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई; अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल – मंत्री नरहरी झिरवाळ

गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई; अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल – मंत्री नरहरी झिरवाळ

June 13, 2026
जळगाव विधान परिषद निवडणूक: रेश्मा काळे यांची माघार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीनंतर सुटला तिढा

जळगाव विधान परिषद निवडणूक: रेश्मा काळे यांची माघार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीनंतर सुटला तिढा

June 13, 2026
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतले श्री हरिहरेश्वर मंदिराचे दर्शन; विकास व मूलभूत सुविधांबाबत आढावा

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतले श्री हरिहरेश्वर मंदिराचे दर्शन; विकास व मूलभूत सुविधांबाबत आढावा

June 12, 2026
‘कृषी मित्र’ भरतीच्या नावाखालील बोगस जाहिराती; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले महत्वाचे आवाहन

‘कृषी मित्र’ भरतीच्या नावाखालील बोगस जाहिराती; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले महत्वाचे आवाहन

June 12, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page