• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नसरापूर चिमुकली अत्याचार-हत्या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा; अवघ्या दोन महिन्यांत पुणे सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 29, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
नसरापूर चिमुकली अत्याचार-हत्या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा; अवघ्या दोन महिन्यांत पुणे सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

पुणे, 29 जून: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी फाशीची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी यापूर्वी २५ जून रोजी आरोपीला दोषी ठरविले होते. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत निकाल लागल्याने हा राज्यातील सर्वात जलदगतीने निकाली निघालेल्या खटल्यांपैकी एक ठरला आहे.

पुणे सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल –

शिक्षा सुनावताना न्यायालयाने हा गुन्हा ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट केले. पीडित मुलगी अवघी साडेतीन वर्षांची असून तिच्यावर अमानुष अत्याचार करून शांत डोक्याने हत्या करण्यात आली. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले वैज्ञानिक व परिस्थितीजन्य पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय अहवाल आणि इतर साक्षी यांमुळे गुन्हा निर्विवादपणे सिद्ध झाल्याचे न्यायालयाने नमूद केले.

नराधमाला फाशीची शिक्षा –

विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करताना सर्वोच्च न्यायालयातील अनेक महत्त्वपूर्ण निकालांचा आधार घेतला. गुन्ह्यातील क्रूरता, पीडितेचे असहाय्य वय, समाजावर झालेला गंभीर परिणाम आणि आरोपीचा पूर्व इतिहास या बाबींचा विचार करून फाशीची शिक्षा देणेच योग्य असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.

अशा गुन्ह्यांना कठोर शिक्षा देणे आवश्यक –

निकाल देताना न्यायालयाने आरोपीचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहासही नोंदविला. यापूर्वीही त्याच्यावर अल्पवयीन मुलगी व महिलांवरील अत्याचाराचे आरोप असल्याचे निरीक्षण नोंदवत, त्याच्यात सुधारणा होण्याची शक्यता नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. समाजात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या अशा गुन्ह्यांना कठोर शिक्षा देणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.

गुन्ह्यानंतर केवळ १६ दिवसांत आरोपपत्र दाखल –

नसरापूरच्या या प्रकरणातील तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेचेही न्यायालयाने कौतुक केले. गुन्ह्यानंतर केवळ १६ दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात आले, तर खटल्याच्या सुनावणीत ५५ साक्षीदार तपासण्यात आले. पोलिस, फॉरेन्सिक तज्ज्ञ, सायबर तज्ज्ञ, डॉक्टर आणि विशेष सरकारी वकिलांनी समन्वयाने केलेल्या कामामुळे अल्पावधीत खटला निकाली निघाल्याचे न्यायालयाने म्हटले.

निर्भया प्रकरणानंतर बालकांच्या संरक्षणासाठी करण्यात आलेल्या कठोर कायद्यांच्या पार्श्वभूमीवर अशा अमानुष गुन्ह्यांविरोधात न्यायव्यवस्था कठोर भूमिका घेत असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले. आरोपीचे कृत्य अत्यंत क्रूर, अमानवी आणि समाजमनाला हादरा देणारे असल्याने त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात येत असल्याचे न्यायालयाने निकालात नमूद केले.

हेही वाचा: टीईटी पेपरफुटी प्रकरणाची शासनाकडून गंभीर दखल; दोषींवर कठोर कारवाई केली जाईल – मंत्री दादाजी भूसे

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhimrao kamblemarathi newsminor girlnasrapur casesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मराठी ही केवळ संवादाची भाषा नव्हे, तर संस्कृती-इतिहासाची साक्षीदार; डिजिटल युगात मराठीला ज्ञानभाषा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी ही केवळ संवादाची भाषा नव्हे, तर संस्कृती-इतिहासाची साक्षीदार; डिजिटल युगात मराठीला ज्ञानभाषा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 4, 2026
जळगावात स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन

जळगावात स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन

October 3, 2026
पाचोरा-भडगावच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक

पाचोरा-भडगावच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक

October 3, 2026
SIRची पडताळणी सुरू; Unmapped व विसंगती असलेल्या मतदारांच्या घरी BLO-AERO पथक जाणार, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

SIRची पडताळणी सुरू; Unmapped व विसंगती असलेल्या मतदारांच्या घरी BLO-AERO पथक जाणार, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

October 3, 2026
दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

October 2, 2026
आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

October 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page