• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात मंत्री गिरीश महाजनांच्या नातेवाईकाला अटक; दोषींवर कठोर कारवाईचा इशारा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 13, 2026
in महाराष्ट्र, क्राईम, ताज्या बातम्या
कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात मंत्री गिरीश महाजनांच्या नातेवाईकाला अटक; दोषींवर कठोर कारवाईचा इशारा

जळगाव, 13 ऑगस्ट: नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाखाली बनावट वर्क ऑर्डर तयार करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात मंत्री गिरीश महाजन यांचे दूरचे नातेवाईक तनय महाजन याला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कुंभमेळा प्राधिकरणाच्या अध्यक्षांची बनावट सही करून तब्बल 70 कोटी रुपयांचे कंत्राट मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मंत्री गिरीश महाजन यांनी तनय महाजन हा आपला फार दूरचा नातेवाईक असल्याचे सांगितले. तसेच, तनयवर यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी म्हटले. या प्रकरणात नातेवाईक असो किंवा इतर कोणीही, दोषी आढळल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असे महाजन यांनी स्पष्ट केले.

मंत्री महाजन यांनी सांगितले की, या प्रकरणात तनयपेक्षा मोठी काही नावे समोर येण्याची शक्यता आहे. काही जणांनी मोठ्या रकमा घेतल्याची माहितीही समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकरणात आपण स्वतः तक्रार केली असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

अटक केलेल्या आरोपीचे वडिल काय म्हणाले? –

तनयचे वडील अनंत महाजन यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. गावातील लोकांकडून तनयला पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तनय शहरात हार्डवेअरचे दुकान चालवत होता; मात्र गेल्या वर्षभरापासून तो दुकानात बसत नसल्याने दुकान बंद करण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले.

या घटनेमुळे आपल्याला मोठा धक्का बसला असून समाजात बदनामी सहन करावी लागत आहे, असे अनंत महाजन यांनी म्हटले. तनय कोणाची फसवणूक करेल, असे आपल्याला वाटत नाही. मात्र, त्याने चुकीचे कृत्य केले असेल तर त्याला कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली.

या प्रकरणात सध्या दोन जणांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपीसह आणखी काही संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

हेही वाचा: भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा !
Share
Tags: kumbh mela fake work order casemarathi newsminister girish mahajansuvarna khandesh livetanay mahajan

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतनिधी मिळेल: आमदार किशोर आप्पा पाटील

VIDEO | पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतनिधी मिळेल: आमदार किशोर आप्पा पाटील

September 27, 2026
मोठी बातमी! राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश, आता नेमक्या कोणत्या सवलती मिळणार?

मोठी बातमी! राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश, आता नेमक्या कोणत्या सवलती मिळणार?

September 26, 2026
“दुष्काळाचा जीआर निघालाच आहे; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे सुरू, नुकसानभरपाई तातडीने देणार!” – मंत्री गिरीश महाजन

“दुष्काळाचा जीआर निघालाच आहे; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे सुरू, नुकसानभरपाई तातडीने देणार!” – मंत्री गिरीश महाजन

September 26, 2026
VIDEO | “दुष्काळ खूप मोठा; पिके देखील मोठ्या प्रमाणात करपलेली आहेत, यामुळे…….!”, दुष्काळाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

VIDEO | “दुष्काळ खूप मोठा; पिके देखील मोठ्या प्रमाणात करपलेली आहेत, यामुळे…….!”, दुष्काळाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

September 25, 2026
दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांना ‘समर्थ दिव्यांग सामाजिक संस्था’ व ‘प्रहार दिव्यांग संघ’ पाचोरा-भडगाव तालुका यांच्या वतीने निवेदन

दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांना ‘समर्थ दिव्यांग सामाजिक संस्था’ व ‘प्रहार दिव्यांग संघ’ पाचोरा-भडगाव तालुका यांच्या वतीने निवेदन

September 25, 2026
पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार: आमदार किशोर आप्पा पाटील

पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार: आमदार किशोर आप्पा पाटील

September 24, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page