• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

तारखेडा बु. येथील बंद शेतरस्ता तातडीने सुरू करा; शेतकऱ्यांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांना निवेदन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 15, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
तारखेडा बु. येथील बंद शेतरस्ता तातडीने सुरू करा; शेतकऱ्यांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांना निवेदन

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 15 ऑगस्ट: पाचोरा तालुक्यातील तारखेडा बु. येथील गावापासून नामदेव झिपरू बागुल यांच्या शेतापर्यंत पूर्वापार वापरात असलेला शेतरस्ता रेल्वे विभागाने गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून बंद केल्याने परिसरातील शेतकऱ्यांसमोर गंभीर समस्या निर्माण झाली आहे. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांची भेट घेऊन रस्ता पूर्ववत सुरू करण्याची मागणी करणारे निवेदन दिले.

सदर रस्ता गट क्र. ३६५/१ ते ३६५/१५ या परिसरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, या रस्त्यावर परिसरातील जवळपास १०० ते १५० शेतकरी अवलंबून आहेत. रस्ता बंद झाल्यामुळे सुमारे १०० ते २०० हेक्टर शेती क्षेत्र प्रभावित होण्याची शक्यता असून, शेतीची कामे करणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे.

शेतामध्ये खते, बी-बियाणे, औषधे, शेतीची अवजारे व इतर साहित्य नेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत असून, अनेक वेळा साहित्य डोक्यावर घेऊन न्यावे लागत आहे. तसेच शेतामध्ये एखादी दुर्घटना, सर्पदंश किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास रुग्णाला तातडीने दवाखान्यात नेण्यासाठी मार्ग उपलब्ध नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

रस्ता बंद राहिल्यास शेतीची कामे वेळेत न झाल्याने मोठ्या प्रमाणावर शेती पडीत पडण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट व कर्जबाजारीपणाचे संकट ओढवू शकते. त्यामुळे हा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

“शेतरस्ता हा शेतकऱ्यांच्या शेतीचा जीवनमार्ग आहे. तो बंद झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे हा मार्ग तातडीने पूर्ववत होणे आवश्यक आहे,” अशी भूमिका यावेळी शेतकऱ्यांनी मांडली.

यावेळी शेतकऱ्यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडे रेल्वे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून सदर पूर्वापार वापरातील शेतरस्ता पूर्ववत सुरू करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी केली. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी शेतकऱ्यांच्या समस्येची दखल घेऊन संबंधित विभागाशी चर्चा करून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या समस्येची तातडीने दखल घेत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी खासदार स्मिता वाघ यांच्याशी दूरध्वनी वरून चर्चा करून रस्ता पूर्ववत सुरू करून द्यावा अशी मागणी करत शेतकऱ्यांची व्यथा मांडली तर खासदार स्मिता वाघ यांनी देखील संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून शेतकऱ्यांना होणार त्रास दूर केला जाईल असे आश्वासन दिले.

हेही वाचा: नदीजोड प्रकल्पाद्वारे राज्यातील दुष्काळावर मात करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा !
Share
Tags: mla kishor appa patilpachora newsshet rastrasuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

SIRची पडताळणी सुरू; Unmapped व विसंगती असलेल्या मतदारांच्या घरी BLO-AERO पथक जाणार, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

SIRची पडताळणी सुरू; Unmapped व विसंगती असलेल्या मतदारांच्या घरी BLO-AERO पथक जाणार, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

October 3, 2026
दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

October 2, 2026
आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

October 2, 2026
पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द ग्रामपंचायतीच्या विकासकामांची चौकशी होणार; प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे

पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द ग्रामपंचायतीच्या विकासकामांची चौकशी होणार; प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे

October 2, 2026
‘ज्येष्ठ नागरिक ही देशाची संपत्ती!’; समाज कल्याण विभागाच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात संपन्न

‘ज्येष्ठ नागरिक ही देशाची संपत्ती!’; समाज कल्याण विभागाच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात संपन्न

October 2, 2026
दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

October 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page