• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द ग्रामपंचायतीच्या विकासकामांची चौकशी होणार; प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे

१५ व्या वित्त आयोगाच्या कामांमध्ये कथित गैरव्यवहाराचा आरोप; 12 ऑक्टोबरला चौकशी समिती प्रत्यक्ष पाहणी करणार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 2, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द ग्रामपंचायतीच्या विकासकामांची चौकशी होणार; प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 2 ऑक्टोबर: पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये कथित बोगस कामे तसेच आर्थिक अफरातफर झाल्याचा आरोप करत चौकशीची मागणी करण्यात आली होती. या मागणीसाठी पाचोरा तहसील कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले उपोषण प्रशासनाच्या अधिकृत आश्वासनानंतर 1 ऑक्टोबर रोजी मागे घेण्यात आले.

उपोषणकर्ते चंद्रकांत विजय पाटील आणि अमोल प्रभाकर पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या विकासकामांबाबत प्रश्न उपस्थित केले होते. संबंधित कामांची प्रत्यक्ष पाहणी, कागदपत्रांची तपासणी तसेच झालेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी होती.

12 ऑक्टोबरला चौकशी समितीची प्रत्यक्ष पाहणी –

उपोषणाची सांगता करताना पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. पाटणकर यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. सारोळा खुर्द ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगाच्या विकासकामांबाबत प्राप्त तक्रारींची चौकशी करण्यासाठी १२ ऑक्टोबर २०२६ रोजी चौकशी समिती ग्रामपंचायतीला प्रत्यक्ष भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या चौकशीदरम्यान संबंधित विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासोबतच ग्रामपंचायतीची कागदपत्रे, कामांवरील खर्च आणि आर्थिक व्यवहारांच्या तपशीलाची पडताळणी केली जाणार आहे. दरम्यान, प्रशासनाकडून चौकशीचे अधिकृत आश्वासन मिळाल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.

मान्यवरांच्या उपस्थितीत उपोषणाची सांगता –

उपोषणाची सांगता जिल्हा परिषद लोहटार-खडकदेवळा गटाचे डॉ. भरत पाटील, पाचोरा तालुका शिवसेना प्रमुख राजेंद्र पाटील आणि शिवसेना उपतालुका प्रमुख छोटू आप्पा सारोळा यांच्या उपस्थितीत झाली. त्यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी देऊन उपोषण सोडण्यात आले.

यावेळी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी पाटणकर, विस्तार अधिकारी परदेशी व बोरसे, तसेच सारोळा येथील ग्रामसेवक सुनील पाटील उपस्थित होते. विशाल पाटील, संजय पाटील, महेंद्र अहिरे, गौतम अहिरे यांच्यासह ग्रामस्थांचीही उपस्थिती होती.

चौकशीच्या अहवालाकडे ग्रामस्थांचे लक्ष –

15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या विकासकामांची गुणवत्ता, प्रत्यक्ष कामाची स्थिती आणि खर्चाच्या विवरणाबाबत होणारी चौकशी आता महत्त्वाची ठरणार आहे. १२ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या प्रत्यक्ष पाहणीत काय निष्पन्न होते आणि चौकशी समितीच्या अहवालातून कोणती वस्तुस्थिती समोर येते, याकडे सारोळा खुर्द ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

बातमी शेअर करा !
Share
Tags: development worksGram Panchayatinquirypachora taluka newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द ग्रामपंचायतीच्या विकासकामांची चौकशी होणार; प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे

पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द ग्रामपंचायतीच्या विकासकामांची चौकशी होणार; प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे

October 2, 2026
‘ज्येष्ठ नागरिक ही देशाची संपत्ती!’; समाज कल्याण विभागाच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात संपन्न

‘ज्येष्ठ नागरिक ही देशाची संपत्ती!’; समाज कल्याण विभागाच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात संपन्न

October 2, 2026
दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

October 2, 2026
मोठी बातमी! जि.प. शाळा आणि अंगणवाड्यांचा कायापालट होणार; ग्रामपंचायतींच्या ‘जनसुविधा’ निधीतून मिळणार लाखो रुपयांचा निधी

मोठी बातमी! जि.प. शाळा आणि अंगणवाड्यांचा कायापालट होणार; ग्रामपंचायतींच्या ‘जनसुविधा’ निधीतून मिळणार लाखो रुपयांचा निधी

October 1, 2026
पाचोऱ्यातील पिंपळगाव बुद्रुक येथे सेवा संकल्प अभियानातून 222 लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवांचा लाभ

पाचोऱ्यातील पिंपळगाव बुद्रुक येथे सेवा संकल्प अभियानातून 222 लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवांचा लाभ

October 1, 2026
चार भंगार व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल; 75 हजारांचा कॉपर-ॲल्युमिनियम तारसाठा जप्त, पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची कारवाई

चार भंगार व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल; 75 हजारांचा कॉपर-ॲल्युमिनियम तारसाठा जप्त, पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची कारवाई

October 1, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page