• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Bus Accident News: नाशिक-पाचोरा बसचा अपघात; एसटी बस आणि भरधाव ट्रकची समोरासमोर धडक, दोन महिलांचा मृत्यू

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 19, 2026
in महाराष्ट्र, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Bus Accident News: नाशिक-पाचोरा बसचा अपघात; एसटी बस आणि भरधाव ट्रकची समोरासमोर धडक, दोन महिलांचा मृत्यू

मालेगाव, 19 ऑगस्ट: मालेगाव-चाळीसगाव मार्गावरील दहिवाळ शिवारात नाशिकहून पाचोऱ्याकडे येणाऱ्या बुधवारी एसटी बसची आणि भरधाव ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत बसमधील दोन महिला प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून २३ प्रवासी जखमी झाले आहेत. धडक एवढी जोरदार होती की, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

नेमकं काय घडलं? –

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिंपळगाव वसंत आगाराची नाशिक-पाचोरा एसटी बस ४० हून अधिक प्रवाशांना घेऊन मालेगावहून चाळीसगावच्या दिशेने जात होती. दहिवाळ शिवारात पोहोचली असता चाळीसगावकडून येणाऱ्या ट्रकची बसला समोरून जोरदार धडक बसली. दोन्ही वाहनांचा वेग अधिक असल्याने अपघाताची तीव्रता वाढली. धडकेनंतर बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.

अपघातात दोघांचा मृत्यू –

या अपघातात इरशाद बी रमजान मणियार (६०, रा. जामनेर) आणि सखुबाई किरण माळी (६५, रा. एरंडोल) या दोन महिलांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना तातडीने मालेगाव येथील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

जखमींमध्ये प्रणिता विनोद ततार (४७), राजेंद्र जगन्नाथ ततार (६३), आशा राजेंद्र ततार (५७) यांच्यासह ऋतुजा शुभम सोनजे (२४), अरमान नजीम पिंजारी (३५), गोकुळ रामदास भामरे (६५), सुनंदा गोकुळ भामरे (६०), सुहाना अझीसा (१९), निधा अझीसा (६६) आणि रत्नाबाई नाना अहिरे (६०) यांचा समावेश आहे.

दरम्यान, या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसटी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या या अपघातामुळे मालेगाव-चाळीसगाव मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा: 💥VIDEO | धक्कादायक! जुन्नर तालुक्यात नऊ वर्षीय चिमुरडीवर अत्याचारानंतर हत्या; आरोपीला अटक, पोलीस अधीक्षकांनी दिली महत्वाची माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: bus accidentlatest newsmalegaon bus accidentmarathi newsmsrtc bus accidentnashik pachora bus accidentsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आठवीऐवजी दहावीपर्यंत पोषण आहार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याचे दिले निर्देश

आठवीऐवजी दहावीपर्यंत पोषण आहार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याचे दिले निर्देश

October 7, 2026
Chopda News: चोपड्यात जीवामृत, वर्मी कंपोस्ट व दशपर्णी निर्मितीचे प्रशिक्षण संपन्न

Chopda News: चोपड्यात जीवामृत, वर्मी कंपोस्ट व दशपर्णी निर्मितीचे प्रशिक्षण संपन्न

October 7, 2026
कुपनलिकेची 7/12 वर नोंद करण्यासाठी तलाठ्याने घेतली लाच; जळगाव ACB ने पकडले रंगेहाथ

कुपनलिकेची 7/12 वर नोंद करण्यासाठी तलाठ्याने घेतली लाच; जळगाव ACB ने पकडले रंगेहाथ

October 7, 2026
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांच्याकडून 2 लाखांचा धनादेश सुपूर्द

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांच्याकडून 2 लाखांचा धनादेश सुपूर्द

October 7, 2026
आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा! सेवा संकल्प अभियानाअंतर्गत पार पडला महिला बचत गटांचा मेळावा

आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा! सेवा संकल्प अभियानाअंतर्गत पार पडला महिला बचत गटांचा मेळावा

October 6, 2026
एरंडोल येथील डीडीएसपी महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणीला सुरुवात

एरंडोल येथील डीडीएसपी महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणीला सुरुवात

October 6, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page