• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home व्हिडीओ

धक्कादायक! जुन्नर तालुक्यात नऊ वर्षीय चिमुरडीवर अत्याचारानंतर हत्या; आरोपीला अटक, पोलीस अधीक्षकांनी दिली महत्वाची माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 19, 2026
in व्हिडीओ, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
धक्कादायक! जुन्नर तालुक्यात नऊ वर्षीय चिमुरडीवर अत्याचारानंतर हत्या; आरोपीला अटक, पोलीस अधीक्षकांनी दिली महत्वाची माहिती

पुणे, 19 ऑगस्ट: जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात नऊ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (18 ऑगस्ट) घडली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी साहिल संपत खैरे (वय 25) याला ताब्यात घेत अटक केली आहे. विशेष म्हणजे, आरोपी स्वतःच पोलिसांसोबत मुलीच्या शोधकार्यात सहभागी झाला होता.

मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि त्याच्या हालचालींवरून पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेत चौकशी केली असता या प्रकरणाचा उलगडा झाला. दरम्यान, घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी काही काळ पुणे-नाशिक महामार्ग रोखून धरत तीव्र संताप व्यक्त केला. आंदोलनानंतर सध्या महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

नेमकं काय घडलं? –

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील नेहमीप्रमाणे शेतावर मजुरीसाठी गेले होते. मुलीला कांजण्या झाल्याने ती त्या दिवशी शाळेत गेली नव्हती आणि घरात एकटीच होती. दुपारी आई-वडील घरी परतल्यानंतर मुलगी घरात दिसून आली नाही. त्यांनी परिसरात तसेच तिच्या मैत्रिणी आणि शेजाऱ्यांकडे चौकशी केली; मात्र तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.

यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने मुलीचा शोध सुरू करण्यात आला. परिसरातील उसाची शेतं, टोमॅटोचे जुने प्लॉट, बागायती क्षेत्र तसेच ओढा आणि नाल्यांच्या परिसरात शोध घेण्यात आला. सुरुवातीला परिसरात बिबट्यांचा वावर असल्याने त्या दिशेनेही शक्यता तपासण्यात आली. मात्र बराच शोध घेऊनही मुलीचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती देऊन तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी पथक पाठवून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. याचदरम्यान गावातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक व्यक्ती सायकलवरून जाताना दिसली. विशेष म्हणजे, शोधमोहीम सुरू असताना संशयित व्यक्ती इतर ग्रामस्थांसोबतच बसलेला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पोलिसांच्या निरीक्षणातून सीसीटीव्ही फुटेजमधील हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याच्याकडे चौकशी करण्यात आली.

चौकशीदरम्यान संशयिताने वेगवेगळी माहिती दिल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याने दाखवलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, घटनेमुळे पिंपळवंडी परिसरात संतापाचे वातावरण आहे.

पुढील 15 दिवसांत दोषारोपत्र दाखल होणार – एसपी संदीपसिंह गिल

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी आज माध्यमांसोबत संवाद साधताना माहिती दिली की, जुन्रर तालुक्यातील ही दुर्दैवी घटना असून तेथील ग्रामस्थांसोबत संवाद साधण्यात आला आहे. या प्रकरणात जलदगतीने तपास करुन आरोपीविरोधात न्यायालयात पुढील 15 दिवसांत दोषारोपत्र दाखल केले जाईल, असे आश्वासन पीडितेच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांना दिले असल्याची गिल म्हणाले.

हेही वाचा: पाचोऱ्यातील शिवाजी नगर भागातील ‘चांदसी दवाखाना’ सील; बोगस डॉक्टरवर कारवाई

बातमी शेअर करा !
Share
Tags: junnar girl murder casejunnar newsmarathi newspune gramin sp sandipsingh gillsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आठवीऐवजी दहावीपर्यंत पोषण आहार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याचे दिले निर्देश

आठवीऐवजी दहावीपर्यंत पोषण आहार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याचे दिले निर्देश

October 7, 2026
Chopda News: चोपड्यात जीवामृत, वर्मी कंपोस्ट व दशपर्णी निर्मितीचे प्रशिक्षण संपन्न

Chopda News: चोपड्यात जीवामृत, वर्मी कंपोस्ट व दशपर्णी निर्मितीचे प्रशिक्षण संपन्न

October 7, 2026
कुपनलिकेची 7/12 वर नोंद करण्यासाठी तलाठ्याने घेतली लाच; जळगाव ACB ने पकडले रंगेहाथ

कुपनलिकेची 7/12 वर नोंद करण्यासाठी तलाठ्याने घेतली लाच; जळगाव ACB ने पकडले रंगेहाथ

October 7, 2026
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांच्याकडून 2 लाखांचा धनादेश सुपूर्द

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांच्याकडून 2 लाखांचा धनादेश सुपूर्द

October 7, 2026
आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा! सेवा संकल्प अभियानाअंतर्गत पार पडला महिला बचत गटांचा मेळावा

आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा! सेवा संकल्प अभियानाअंतर्गत पार पडला महिला बचत गटांचा मेळावा

October 6, 2026
एरंडोल येथील डीडीएसपी महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणीला सुरुवात

एरंडोल येथील डीडीएसपी महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणीला सुरुवात

October 6, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page