• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

पाचोरा स्थानकावर अधिक गाड्यांना थांबा देण्याचीही मागणी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 22, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 22 ऑगस्ट: तारखेडा परिसरातील रेल्वे गेट तसेच शेतकऱ्यांसाठी वापरला जाणारा रस्ता रेल्वे प्रशासनाकडून बंद करण्यात आल्याने निर्माण झालेल्या समस्येची खासदार स्मिता वाघ यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. नागरिक व शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी बंद करण्यात आलेल्या मार्गाला पर्यायी व्यवस्था तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

तारखेडा परिसरातील रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद झाल्याने ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. या प्रश्नाबाबत ग्रामस्थांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांची भेट घेऊन समस्या मांडली होती. आमदार पाटील यांनी या प्रश्नाची तातडीने दखल घेत खासदार स्मिता वाघ यांच्याशी संपर्क साधून रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधत समस्या सोडविण्याची मागणी केली.

यानंतर शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील यांनीही खासदार स्मिता वाघ यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून रेल्वे मार्गामुळे निर्माण झालेल्या अडचणी तसेच ग्रामस्थांच्या विविध मागण्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सूचनेनुसार आणि तालुकाप्रमुख राजू दादा पाटील यांच्या पाठपुराव्याची दखल घेत खासदार वाघ यांनी अवघ्या दोन ते तीन दिवसांत तारखेडा येथे भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली.

पाहणीदरम्यान खासदार स्मिता वाघ यांनी रेल्वे मार्गालगतच्या विविध ठिकाणी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. ज्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने अचानक रस्ता बंद केला आहे, त्या ठिकाणी शेतकरी व नागरिकांची ये-जा तसेच शेतीच्या कामांमध्ये अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पर्यायी मार्गाची तातडीने व्यवस्था करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

दरम्यान, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील यांनी पाचोरा रेल्वे स्थानकावरील प्रवासी सुविधांमध्ये वाढ करण्याबरोबरच अधिक रेल्वे गाड्यांना पाचोरा येथे थांबा देण्याची मागणी खासदार वाघ यांच्याकडे केली. त्यावर खासदार वाघ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रथम विदर्भ एक्स्प्रेसला पाचोरा येथे थांबा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच इतर प्रवासी सुविधा व मागण्यांसाठीही टप्प्याटप्प्याने पाठपुरावा करण्याचे त्यांनी सांगितले.

या पाहणीवेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मधूकर काटे, सुभाष पाटील, नंदू पाटील, गणेश पाटील वाघुलखेडा यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पाहणीनंतर खासदार स्मिता वाघ यांनी काही दिवसांपूर्वी तारखेडा येथे झालेल्या रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या राजेंद्र पाटील यांच्या चुलत पुतण्याच्या कुटुंबीयांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सांत्वन केले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक वसंत वाघ, शिवसेना शाखाप्रमुख धनराज पाटील, किशोर पाटील, पंकज पाटील, आनंदा पाटील, निलेश पाटील, विजय पाटील, शरद पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा: व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

बातमी शेअर करा !
Share
Tags: farmers road closedmarathi newsmp smita waghsuvarna khandesh livetarkheda railway crossing

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आठवीऐवजी दहावीपर्यंत पोषण आहार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याचे दिले निर्देश

आठवीऐवजी दहावीपर्यंत पोषण आहार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याचे दिले निर्देश

October 7, 2026
Chopda News: चोपड्यात जीवामृत, वर्मी कंपोस्ट व दशपर्णी निर्मितीचे प्रशिक्षण संपन्न

Chopda News: चोपड्यात जीवामृत, वर्मी कंपोस्ट व दशपर्णी निर्मितीचे प्रशिक्षण संपन्न

October 7, 2026
कुपनलिकेची 7/12 वर नोंद करण्यासाठी तलाठ्याने घेतली लाच; जळगाव ACB ने पकडले रंगेहाथ

कुपनलिकेची 7/12 वर नोंद करण्यासाठी तलाठ्याने घेतली लाच; जळगाव ACB ने पकडले रंगेहाथ

October 7, 2026
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांच्याकडून 2 लाखांचा धनादेश सुपूर्द

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांच्याकडून 2 लाखांचा धनादेश सुपूर्द

October 7, 2026
आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा! सेवा संकल्प अभियानाअंतर्गत पार पडला महिला बचत गटांचा मेळावा

आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा! सेवा संकल्प अभियानाअंतर्गत पार पडला महिला बचत गटांचा मेळावा

October 6, 2026
एरंडोल येथील डीडीएसपी महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणीला सुरुवात

एरंडोल येथील डीडीएसपी महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणीला सुरुवात

October 6, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page