• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांचे पहाटे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’, हद्दपार गुन्हेगारासह ५५ जणांवर कारवाई

११ अजामीनपात्र बजावले वॉरंट, अवैध दारूचा २२ हजारांचा मुद्देमाल जप्त

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 13, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांचे पहाटे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’, हद्दपार गुन्हेगारासह ५५ जणांवर कारवाई

पाचोरा, 13 सप्टेंबर: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पाचोरा पोलिसांनी रविवारी पहाटे धडक ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ राबविले. पहाटे ३ ते सकाळी ६.३० वाजेपर्यंत शहर तसेच ग्रामीण हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईत अभिलेखावरील ५५ गुन्हेगारांना ताब्यात घेऊन समज देण्यात आली. तसेच हद्दपार असलेला सराईत गुन्हेगार हद्दीत आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पोलीस अधिकारी, २५ पोलीस अंमलदार आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने संयुक्तपणे ही मोहीम राबविली. यावेळी सराईत गुन्हेगार, शरीर व मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल असलेले आरोपी तसेच अवैध धंद्यांमध्ये सहभागी असलेल्या संशयितांच्या घरांची अचानक तपासणी व झडती घेण्यात आली.

या कारवाईत पाचोरा पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील एकूण ५५ आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य करू नये, याबाबत त्यांना कडक समज देण्यात आली. दरम्यान, पाचोरा शहरातून हद्दपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार मुख्तार शेख उर्फ धाड्या हा पोलिसांना हद्दीत आढळून आला. त्याच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली.

तसेच न्यायालयात प्रलंबित असलेल्या विविध प्रकरणांतील ११ अजामीनपात्र वॉरंट (NBW) बजावण्यात आले. अवैध दारू विक्रीविरोधातही पोलिसांनी कारवाई केली. प्रोहिबिशन रेडमध्ये एकूण २२ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय अवैध गोवंश वाहतुकीविरोधात एक, तर बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी आर्म ॲक्टअंतर्गत एक कारवाई करण्यात आली.

गणेशोत्सवाच्या काळात शांतता भंग करणाऱ्या, कायदा हातात घेणाऱ्या तसेच अवैध धंदे चालविणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. शहर व ग्रामीण भागात अशा प्रकारची धडक तपासणी, गस्त आणि कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले.

हेही वाचा: एमपीएससी परीक्षांमध्ये ‘झिरो लीक’चे लक्ष्य; पुढील वर्षभर ओएमआर पद्धतीनेच परीक्षा, उच्चस्तरीय भरती परीक्षा टास्क फोर्सची सल्लामसलत

बातमी शेअर करा !
Share
Tags: combing operationganeshotsavpachora newspachora police stationsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime News: तब्बल 40 दिवसांनी उलगडले 85 वर्षीय महिलेच्या अपहरण-खुनाचे गूढ; जळगाव LCB ने नेमका कसा लावला तपास?

Crime News: तब्बल 40 दिवसांनी उलगडले 85 वर्षीय महिलेच्या अपहरण-खुनाचे गूढ; जळगाव LCB ने नेमका कसा लावला तपास?

September 13, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांचे पहाटे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’, हद्दपार गुन्हेगारासह ५५ जणांवर कारवाई

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांचे पहाटे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’, हद्दपार गुन्हेगारासह ५५ जणांवर कारवाई

September 13, 2026
आमदार श्वेता महाले यांच्याबाबत वक्तव्य; आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

आमदार श्वेता महाले यांच्याबाबत वक्तव्य; आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

September 13, 2026
ब्रिक्स शिखर परिषदेत दिल्ली घोषणा 2026 ला एकमताने मंजुरी; नेमक्या कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?

ब्रिक्स शिखर परिषदेत दिल्ली घोषणा 2026 ला एकमताने मंजुरी; नेमक्या कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?

September 13, 2026
एमपीएससी परीक्षांमध्ये ‘झिरो लीक’चे लक्ष्य; पुढील वर्षभर ओएमआर पद्धतीनेच परीक्षा, उच्चस्तरीय भरती परीक्षा टास्क फोर्सची सल्लामसलत

एमपीएससी परीक्षांमध्ये ‘झिरो लीक’चे लक्ष्य; पुढील वर्षभर ओएमआर पद्धतीनेच परीक्षा, उच्चस्तरीय भरती परीक्षा टास्क फोर्सची सल्लामसलत

September 13, 2026
अंतरवाली ते थेट आझाद मैदान; मराठा मोर्चाचा मार्ग ठरला, मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आंदोलनाचे नियोजन

अंतरवाली ते थेट आझाद मैदान; मराठा मोर्चाचा मार्ग ठरला, मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आंदोलनाचे नियोजन

September 12, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page