• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जनगणना 2027 प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण सत्र; अचूक व प्रभावी अंमलबजावणीसाठी नव्या मॉडेलचा होणार वापर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 23, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जनगणना 2027 प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण सत्र; अचूक व प्रभावी अंमलबजावणीसाठी नव्या मॉडेलचा होणार वापर

जळगाव, 23 सप्टेंबर: ‘जनगणना २०२७’ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी  विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात करण्यात आले होते. राज्य शासनाच्या जनगणना संचालनालय व जिल्हाधिकारी तथा जिल्हा प्रधान जनगणना अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण घेण्यात आले.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा प्रधान जनगणना अधिकारी रोहन घुगे यांच्या निर्देशानुसार तसेच  प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी महेश चौधरी यांच्या समन्वयातून हे प्रशिक्षण झाले. जनगणना संचालनालयाचे सहायक संचालक अजय ठाकूर व श्रीकांत बनकर यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्ह्यातील तहसिलदार तथा चार्ज अधिकारी, महानगरपालिका अधिकारी व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी तथा चार्ज अधिकारी, नगरपंचायत अधिकारी तथा चार्ज अधिकारी, महसूल सहायक अधिकारी, तांत्रिक सहायक, चार्ज अधिकारी यांचे लिपिक आदी उपस्थित होते.

प्रशिक्षणात घरयादी व घरगणना तयार करणे, प्रगणक गट निश्चित करण्याची सर्वसाधारण तत्त्वे, सीएमएमएस प्रणालीमध्ये प्रगणक गट तयार करण्याची कार्यपद्धती, घरयादी गटांची यादी व उपगट तयार करणे, मांडणी दर्शक नकाशाचे पुनरावलोकन, गणना घरांची निवड व वाटप, प्रगणक गट ‘फ्रीज’ करणे, उपगटांचा समावेश, तसेच उपगटांचे सीमांकन व जिओ-टॅगिंग याबाबत पीपीटीच्या माध्यमातून सविस्तर माहिती देण्यात आली.

या जनगणनेत नैसर्गिक सीमांच्या व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात येणार आहे. मागील जनगणनेच्या तुलनेत प्रश्नावलीतील प्रश्नांची संख्या २८ वरून ४० करण्यात आली असून प्रश्नावली व्यक्तिनिहाय असणार आहे. अचूक व प्रभावी अंमलबजावणीसाठी नव्या मॉडेलचा वापर करण्यात येणार आहे.

जनगणना कामात अचूकता राहावी यासाठी प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी गावनिहाय लोकसंख्या, घरांची संख्या आणि प्रत्येक गटाची माहिती कागदावर व्यवस्थित नोंदवून नियोजन करावे. त्यामुळे पोर्टलवर काम करताना अडचणी टाळून प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण करता येईल, असे प्रशिक्षणात सांगण्यात आले.

पूर्वीच्या एक हजार लोकसंख्येच्या प्रगणक गटांची मर्यादा आता ८०० करण्यात आली आहे. कामाचा अतिरिक्त ताण टाळून योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने हा बदल करण्यात आला आहे. जनगणनेतील प्रत्येक टप्पा निर्धारित वेळेत पूर्ण करून शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळावी, अशा सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.

प्रशिक्षणादरम्यान उपस्थितांनी जनगणना प्रक्रियेबाबत विचारलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी उत्तरे देऊन शंकांचे निरसन केले. सर्व संबंधित यंत्रणांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार आणि निर्धारित कार्यपद्धतीनुसार अचूकपणे काम पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले.

प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयालयाच्या जनगणना शाखेतील सहायक महसूल अधिकारी ए पी जोशी, सुनिता खडके, किशोर पाटील, राजेश जाधव, हर्षदा वैद्य, उदय लोखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

हेही वाचा: माजी मंत्री बच्चू कडू उद्या पाचोऱ्यात; शिवसंवाद दौऱ्यानिमित्त शेतकरी, दिव्यांग व विविध सामाजिक घटकांशी साधणार संवाद

बातमी शेअर करा !
Share
Tags: census 2027jalgaon dm rohan ghugejalgaon newsspecial training sessionsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपड्यातील गणेशोत्सवातील बंदोबस्ताबद्दल मुस्लिम बांधवांकडून पोलीस निरीक्षक पवन देसले यांचा सत्कार

चोपड्यातील गणेशोत्सवातील बंदोबस्ताबद्दल मुस्लिम बांधवांकडून पोलीस निरीक्षक पवन देसले यांचा सत्कार

September 23, 2026
जनगणना 2027 प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण सत्र; अचूक व प्रभावी अंमलबजावणीसाठी नव्या मॉडेलचा होणार वापर

जनगणना 2027 प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण सत्र; अचूक व प्रभावी अंमलबजावणीसाठी नव्या मॉडेलचा होणार वापर

September 23, 2026
माजी मंत्री बच्चू कडू उद्या पाचोऱ्यात; शिवसंवाद दौऱ्यानिमित्त शेतकरी, दिव्यांग व विविध सामाजिक घटकांशी साधणार संवाद

माजी मंत्री बच्चू कडू उद्या पाचोऱ्यात; शिवसंवाद दौऱ्यानिमित्त शेतकरी, दिव्यांग व विविध सामाजिक घटकांशी साधणार संवाद

September 23, 2026
पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे 45.49 कोटींचा वाढीव निधी; आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे 45.49 कोटींचा वाढीव निधी; आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

September 23, 2026
देशनिहाय स्किल पासपोर्ट, अद्ययावत प्रशिक्षण आणि सुरक्षित भरती प्रक्रियेवर राज्य शासनाचा भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशनिहाय स्किल पासपोर्ट, अद्ययावत प्रशिक्षण आणि सुरक्षित भरती प्रक्रियेवर राज्य शासनाचा भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 22, 2026
जळगाव जिल्ह्यात ‘स्पेलिंग बी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी सक्षमीकरणाला नवी दिशा; जिल्हास्तरीय स्पर्धेत चार गटांतील 120 विद्यार्थी सहभागी होणार

जळगाव जिल्ह्यात ‘स्पेलिंग बी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी सक्षमीकरणाला नवी दिशा; जिल्हास्तरीय स्पर्धेत चार गटांतील 120 विद्यार्थी सहभागी होणार

September 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page