• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home भडगाव

पाचोरा-भडगावच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक

शेतकरी योजना, अतिक्रमण, घरकुल, रस्ते, दुष्काळी उपाययोजनांसह विविध विषयांवर होणार चर्चा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 3, 2026
in भडगाव, ताज्या बातम्या, पाचोरा
पाचोरा-भडगावच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 3 ऑक्टोबर: पाचोरा-भडगाव मतदारसंघातील विविध विभागांशी संबंधित प्रलंबित प्रश्न, संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजना व विभागांमध्ये आवश्यक समन्वय, तसेच शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी सोमवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता पाचोरा येथील भडगाव रोडवरील कै. आर. ओ. पाटील व्यापारी संकुलात विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीस पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, पाचोरा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत शेतकरी व सर्वसामान्यांसाठी महावितरण, कृषी विभाग व इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा, तसेच संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजनांवर चर्चा होणार आहे.

यासोबतच पाचोरा व भडगाव नगरपरिषद हद्दीतील अतिक्रमणे नियमित करण्याचा प्रश्न, भडगाव येथील सुकी नदी पात्रास नगर भूमापन क्रमांक देणे, भूमी अभिलेख विभागातील प्रलंबित मोजणी प्रकरणे निकाली काढणे, तसेच पाचोरा-तारखेडा रस्त्याच्या भूसंपादनाचा प्रश्न यावरही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

पाटबंधारे विभागाचे प्रलंबित प्रकल्प, भडगाव येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी जागेची उपलब्धता, पाचोरा व भडगाव पंचायत समितीअंतर्गत घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून देणे व मंजुरी, तसेच महिला व बालविकास, सामाजिक वनीकरण आणि एसटी महामंडळाशी संबंधित योजनांचाही आढावा घेतला जाणार आहे.

दरम्यान, बैठकीस संबंधित विभागांच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाशी निगडित अद्ययावत माहिती, योजनांचा तपशील, प्रलंबित प्रकरणांची माहिती तसेच आवश्यक कागदपत्रांसह स्वतः उपस्थित राहावे, असे निर्देश पाचोरा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी दिले आहेत.

मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांना गती देण्यासोबतच संभाव्य दुष्काळाच्या परिस्थितीत प्रशासनाची पूर्वतयारी, शेतकरी व नागरिकांना योजनांचा प्रभावी लाभ आणि विविध विकासकामांबाबत ठोस आढावा या बैठकीत घेतला जाणार असल्याने या बैठकीकडे पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

बातमी शेअर करा !
Share
Tags: guardian minister gulabrao patilpachora-bhadgaon newsreview meetingsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन

जळगावात स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन

October 3, 2026
पाचोरा-भडगावच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक

पाचोरा-भडगावच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक

October 3, 2026
SIRची पडताळणी सुरू; Unmapped व विसंगती असलेल्या मतदारांच्या घरी BLO-AERO पथक जाणार, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

SIRची पडताळणी सुरू; Unmapped व विसंगती असलेल्या मतदारांच्या घरी BLO-AERO पथक जाणार, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

October 3, 2026
दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

October 2, 2026
आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

October 2, 2026
पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द ग्रामपंचायतीच्या विकासकामांची चौकशी होणार; प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे

पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द ग्रामपंचायतीच्या विकासकामांची चौकशी होणार; प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे

October 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page