• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 11, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

नाशिक, 11 ऑक्टोबर: राज्यातील ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि संभाव्य टंचाईवर मात करण्यासाठी आज रविवार, ११ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२६-२७’ चा शानदार शुभारंभ होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून, याच कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायतींना ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार २०२५-२६’ देऊन गौरविण्यात येणार आहे. या निमित्ताने नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने राज्यभरातील सरपंचांसाठी एका विशेष ‘सरपंच परिसंवादाचे’ देखील आयोजन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा –
मागील वर्षाच्या अभियानाचा अंतिम निकाल आज अधिकृतपणे जाहीर केला जाणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार २०२५-२६’ प्रदान करून सन्मानित केले जाईल. मागील टप्प्यात ज्या गावांनी जलव्यवस्थापन, स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि लोकसहभागात सर्वोत्तम कामगिरी केली, त्यांच्या यशाचा गौरव आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

मागील अभियानात ५,५०० गावांचा कायापालट –
मागील वर्षी राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्यातील सुमारे साडेपाच हजार (५,५००) गावांमध्ये विविध महत्त्वपूर्ण विकासकामे यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहेत. लोकसहभागाची उत्तम साथ मिळाल्याने या गावांचा कायापालट करण्यात प्रशासनाला मोठे यश आले असून, ग्रामीण विकासाला एक नवी गती मिळाली असल्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

योजनांचे अभिसरण आणि निधीचा प्रभावी वापर –
मागच्या वर्षीच्या अभियानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विविध शासकीय विभागांच्या योजनांचे केलेले यशस्वी अभिसरण (Convergence) हे ठरले. गावांच्या विकासासाठी उपलब्ध असलेला निधी आणि स्थानिक संसाधनांचा अत्यंत प्रभावी व सुनियोजित वापर करण्यात आला. यामुळे गावांतर्गत रस्ते, पायाभूत सुविधांची उभारणी, आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा, स्वच्छता मोहीम आणि जलसंधारणाची कामे गतीने पूर्ण होऊन थेट ग्रामीण जनतेला त्याचा मोठा फायदा मिळाला, असल्याचेही मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले.

आगामी टप्प्यात जलसुरक्षा आणि रोजगार निर्मितीवर मुख्य भर –
मागील वर्षाच्या यशानंतर आता आगामी २०२६-२७ च्या मोहिमेत संभाव्य दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी पाणी व्यवस्थापनाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे. गावातील पाण्याचे स्रोत बळकट करणे, पावसाचे पाणी अडवणे-जिरवणे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगवर भर दिला जाईल. संभाव्य टंचाई लक्षात घेऊन प्रत्येक गावाला पुढील ऑगस्ट २०२७ पर्यंतचे पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच जलसंधारणाच्या कामांमधून शेतमजुरांना स्थानिक पातळीवरच मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

जिल्हा परिषद नाशिक येथे काल आयोजित पत्रकार परिषदेत ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, यशदाचे उपमहासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी, खाजगी सचिव सुनील कोठेकर आणि नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा: पाचोऱ्यात दुष्काळी पंचनामे अंतिम टप्प्यात; येत्या दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन, तहसीलदार विजय बनसोडे यांनी दिली महत्वाची माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newsmspramukhyamantri samruddha panchayat raj abhiyanmukhyamantri samruddha panchayat raj abhiyan awards 2.0mukhyamantri samruddha panchayat raj abhiyan awards 2025-26suvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
पाचोऱ्यात दुष्काळी पंचनामे अंतिम टप्प्यात; येत्या दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन, तहसीलदार विजय बनसोडे यांची माहिती

पाचोऱ्यात दुष्काळी पंचनामे अंतिम टप्प्यात; येत्या दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन, तहसीलदार विजय बनसोडे यांची माहिती

October 10, 2026
जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

October 9, 2026
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

October 9, 2026
मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

October 8, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page