• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पहूर येथे उद्या आदिवासी विकासमंत्र्याच्या उपस्थितीत आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

विविध योजनांची माहिती, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि शिक्षकांना नियुक्तिपत्रांचे होणार वाटप

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 16, 2026
in जळगाव जिल्हा, जामनेर, ताज्या बातम्या
पहूर येथे उद्या आदिवासी विकासमंत्र्याच्या उपस्थितीत आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

जळगाव, 16 ऑक्टोबर: आदिवासी समाजातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचवून त्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे आणि तडवी-भिल्ल समाजासह आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची माहिती आणि मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ उद्या शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जामनेर तालुक्यातील पहूर येथे भव्य आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा ‘माळी समाज मंगल कार्यालय येथे होणार आहे.

राज्याचे आदिवासी विकासमंत्री प्रा.डॉ.अशोक उईके मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी असतील. जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि पसमंदा मुस्लिम समाज अभ्यास समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) इद्रिस मुलतानी यांच्यासह जिल्ह्यातील खासदार व आमदार उपस्थित राहणार आहेत.

जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आयुक्त लीना बनसोड, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर आणि आदिवासी विकास विभागाचे नाशिक येथील अपर आयुक्त दिनकर पावरा हे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहतील.

मेळाव्यात आदिवासी विकास विभागासह अन्य शासकीय विभागांच्या वतीने विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणारे स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार आहेत. शैक्षणिक, आर्थिक, गृहनिर्माण आणि स्वयंरोजगार योजनांचे निकष, आवश्यक कागदपत्रे तसेच ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेबाबत नागरिकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले जाईल. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना योजनांची माहिती मिळविणे आणि लाभासाठी अर्ज करणे सुलभ होणार आहे.

नाशिक विभागातील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या तीन विद्यार्थी आणि तीन विद्यार्थिनी अशा सहा गुणवंत विद्यार्थ्यांना ‘राघोजी भांगरे विद्यार्थी गुणगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे पारदर्शक पद्धतीने निवड झालेल्या शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते अधिकृत सेवा नियुक्तिपत्रे वितरित करण्यात येणार आहेत.

तडवी-भिल्ल समाजासह आदिवासी समाजातील गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जामनेर, पहूर आणि परिसरातील आदिवासी समाजबांधव, महिला, युवक-युवती आणि पात्र लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून योजनांची माहिती घ्यावी आणि उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले आहे.

हेही वाचा: महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newsmelavaseva sankalp abhiyan 2026suvarna khandesh livetribal beneficiariestribal development minister ashok uike

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पहूर येथे उद्या आदिवासी विकासमंत्र्याच्या उपस्थितीत आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

पहूर येथे उद्या आदिवासी विकासमंत्र्याच्या उपस्थितीत आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

October 16, 2026
महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page