• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावचा जलसंधारण पॅटर्न राज्यभर राबविणार; लोकसहभागातून दुष्काळमुक्तीसाठी प्रयत्न – मंत्री संजय राठोड

धरणगाव, एरंडोल व पारोळा तालुक्यांतील जलसंधारण कामांची दोन्ही मंत्र्यांकडून संयुक्त पाहणी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 29, 2026
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
जळगावचा जलसंधारण पॅटर्न राज्यभर राबविणार; लोकसहभागातून दुष्काळमुक्तीसाठी प्रयत्न – मंत्री संजय राठोड

जळगाव, 29 नोव्हेंबर: पावसाचा प्रत्येक थेंब अडवायचा, तो जमिनीत मुरवायचा आणि खालावलेली भूजल पातळी पुन्हा उंचावायची, हाच दुष्काळावरचा शाश्वत उपाय आहे. या कामात शासनाला लोकांची साथ मिळाली, तर जलसंधारणाची मोठी लोकचळवळ उभी राहू शकते, हे धरणगाव व जळगाव तालुक्यांनी दाखवून दिले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून आकाराला आलेला लोकसहभागाचा हा जलसंधारण पॅटर्न राज्यभर राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले.

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव तालुक्यातील पथराड, शेरी, झुरखेडा, वाघळूद व कल्याणे येथील साठवण बंधारे आणि नाला खोलीकरणाच्या कामांची, तसेच एरंडोल तालुक्यातील गणेशनगर आणि पारोळा तालुक्यातील मोंढाळे व टोळी येथील साठवण बंधाऱ्यांच्या कामांची संयुक्त पाहणी केली. यावेळी कामांची सविस्तर माहिती घेत मंत्री राठोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

जलसंधारण ही लोकचळवळ व्हावी –

राज्यातील ३१० हून अधिक तालुक्यांतील दुष्काळी परिस्थिती आणि घटती भूजल पातळी ही गंभीर बाब असल्याचे मंत्री राठोड यांनी सांगितले. त्यामुळे नाला खोलीकरण, रिचार्ज शाफ्ट, जलतारा प्रकल्प, बंधारे आणि ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ यांसारख्या जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे. जलसाठ्यांतील गाळ शेतात टाकल्यास दुहेरी फायदा होतो. जलसाठ्यांची साठवण क्षमता वाढते, तर जमिनीची सुपीकताही सुधारण्यास मदत होते. सामाजिक व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग, सीएसआर निधी आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून ही कामे अधिक व्यापक प्रमाणावर व्हावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

भूजल पुनर्भरणावर विशेष भर देत खोलीकरण केलेल्या नाल्यांमध्ये तांत्रिकदृष्ट्या योग्य ठिकाणी रिचार्ज शाफ्ट उभारावेत, जेणेकरून भूजल पुनर्भरणाला गती मिळेल, अशी सूचना मंत्री संजय राठोड यांनी केली. पावसाळ्यात नाल्यांच्या काठावरील माती वाहून पुन्हा नाल्यांमध्ये साचू नये, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. जलसंधारणाची कामे दीर्घकाळ टिकणारी आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरतील, याची विशेष दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी लोकसहभागातून तसेच शासकीय योजनांच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले.

पालकमंत्र्यांच्या पुढाकाराचे विशेष कौतुक –

नाला खोलीकरणाच्या माध्यमातून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जलसंधारणाचे महत्त्व जनमानसात रुजविले आहे. शासनाच्या प्रयत्नांना लोकसहभागाची जोड देत जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार उल्लेखनीय असल्याचे सांगत मंत्री संजय राठोड यांनी पालकमंत्र्यांच्या नाला खोलीकरणाच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

शेतकऱ्यांच्या भविष्यातील पाण्याची चिंता दूर करण्यावर भर – पालकमंत्री

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा देण्याबरोबरच भविष्यात वारंवार उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शाश्वत उपाययोजना करणे आवश्यक आहे. आज आपण करीत असलेली जलसंधारणाची कामे ही उद्याच्या दुष्काळमुक्तीची पायाभरणी ठरणार आहे. याच दूरदृष्टीतून मागील वर्षापासून नाला खोलीकरणाची मोहीम हाती घेतल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. जळगाव व धरणगाव तालुक्यांतील ४७२ किलोमीटर नाला खोलीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याची ग्वाही देत त्यांनी प्राथमिक सर्वेक्षणापासून प्रत्यक्ष अंमलबजावणी पर्यंतच्या कामांची सविस्तर माहिती मंत्री संजय राठोड यांना दिली.

बहिणाबाईंच्या कवितासंग्रहाने जलसंधारण मंत्र्यांचे स्वागत –

पाळधी येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खान्देशच्या साहित्यिक वैभवाचे प्रतीक असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा कवितासंग्रह तसेच पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाविषयीचे पुस्तक भेट देऊन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, मुख्य अभियंता श्री. जगताप, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, सरपंच विजय पाटील, उपसरपंच चंदुलाल इंगळे, माजी सभापती प्रेमराज पाटील, गजानन पाटील यांच्यासह जीपीएस फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. झुरखेडा येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनीही दोन्ही मंत्र्यांचे उत्साहात स्वागत केले.

यांची होती उपस्थिती –

यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, मुख्य अभियंता अनंत जगताप, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, माजी महापौर विष्णू भंगाळे, गटविकास अधिकारी सागर कोल्हे, सरपंच विजय पाटील, उपसरपंच चंदुलाल इंगळे, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष पाटील व राहुल मानकर, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता तुषार राजपूत, जलसंधारण विभागाचे उपअभियंता अमोल पाटील, माजी सभापती प्रेमराज पाटील, गजानन पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, जीपीएस मित्र परिवाराचे पदाधिकारी, पक्षाचे कार्यकर्ते, बंजारा समाजबांधव आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा: मुख्यमंत्री सहाय्यता निधीस भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेडची एक कोटींची मदत

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon district newsminister gulabrao patilminister sanjay rathodsuvarna khandesh livewater conservation works

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लासगाव येथे एनसीएमसी कार्ड शिबिर उत्साहात संपन्न, नागरिकांनी मानले आयोजकांचे आभार

लासगाव येथे एनसीएमसी कार्ड शिबिर उत्साहात संपन्न, नागरिकांनी मानले आयोजकांचे आभार

November 29, 2026
जळगावचा जलसंधारण पॅटर्न राज्यभर राबविणार; लोकसहभागातून दुष्काळमुक्तीसाठी प्रयत्न – मंत्री संजय राठोड

जळगावचा जलसंधारण पॅटर्न राज्यभर राबविणार; लोकसहभागातून दुष्काळमुक्तीसाठी प्रयत्न – मंत्री संजय राठोड

November 29, 2026
Pachora News: एनसीएमसी कार्डसाठी पाचोरा आगाराची विशेष मोहीम; तीन गावांत शिबिरांचे आयोजन

Pachora News: एनसीएमसी कार्डसाठी पाचोरा आगाराची विशेष मोहीम; तीन गावांत शिबिरांचे आयोजन

November 28, 2026
“संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक समाजघटकाची”, पाचोऱ्यातील ‘संविधान सन्मान जागर संवाद’मध्ये निखिल रांजणकर यांचे प्रतिपादन

“संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक समाजघटकाची”, पाचोऱ्यातील ‘संविधान सन्मान जागर संवाद’मध्ये निखिल रांजणकर यांचे प्रतिपादन

November 27, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीस भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेडची एक कोटींची मदत, बीव्हीजी, सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज

मुख्यमंत्री सहाय्यता निधीस भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेडची एक कोटींची मदत, बीव्हीजी, सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज

November 27, 2026
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! राज्यातील 33 जिल्ह्यांत पुढील 3 महिने मिळणार मोफत धान्य

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! राज्यातील 33 जिल्ह्यांत पुढील 3 महिने मिळणार मोफत धान्य

November 26, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page