• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home एरंडोल

एरंडोलच्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा शताब्दी महोत्सव उत्साहात; नूतन वास्तूचे लोकार्पण, संस्थेचे महात्मा फुले यांच्या नावाने नामकरण

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 29, 2026
in एरंडोल, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
एरंडोलच्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा शताब्दी महोत्सव उत्साहात; नूतन वास्तूचे लोकार्पण, संस्थेचे महात्मा फुले यांच्या नावाने नामकरण

जळगाव, 29 नोव्हेंबर: सहकारी संस्थांच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील घटकांना आधार मिळायला हवा. सहकाराकडे ‘स्वाहाकार’ किंवा स्वार्थ साधण्याचे माध्यम म्हणून पाहू नका. सचोटीने आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सहकारी संस्थाच शतकानुशतके टिकून राहतात, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. एरंडोल येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या शताब्दी महोत्सवाचे उद्घाटन आणि नूतन वास्तूचे लोकार्पण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे ‘क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले विविध कार्यकारी सहकारी सोसायटी’ असे नामकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते.

प्रामाणिक माणूस कर्जाची परतफेड करतो –

गरीब आणि गरजू माणूस प्रामाणिक असतो. त्याला कर्ज दिल्यास तो त्याची परतफेड नक्कीच करतो. अनेक पतसंस्था आणि सहकारी संस्था सर्वसामान्यांसाठी आधारवड ठरल्या आहेत. मात्र, प्रामाणिकपणा आणि सचोटी जपणाऱ्या संस्थाच दीर्घकाळ टिकून राहिल्या आहेत, असे भुजबळ म्हणाले. पारंपरिक विधी आणि सोहळ्यांवर अवास्तव खर्च करण्यापेक्षा तो पैसा गरजू, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या शिक्षणासाठी, प्रगतीसाठी व मदतीसाठी वापरावा, असे आवाहन करत त्यांनी संस्थेला वैयक्तिक स्वरूपात १० लाख रुपयांची देणगी जाहीर केली.

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करताना भुजबळ यांनी समाजातील विषमता, अस्पृश्यता आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी फुले दाम्पत्याने केलेला संघर्ष आजही प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. शिक्षण, शेती, जलसंधारण आणि सामाजिक समतेचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणाऱ्या महात्मा फुले यांच्या कार्याचा वारसा सहकारी संस्थांनी पुढे न्यावा, असेही त्यांनी सांगितले.

फुलेंचे नाव फलकावर नव्हे, कारभारात दिसावे; सोसायट्या बहुउद्देशीय सेवा केंद्रे बनाव्यात – पालकमंत्री गुलाबराव पाटील

महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव संस्थेच्या फलकावर नव्हे, तर पारदर्शक कारभारात, निर्णयांत आणि शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सन्मानपूर्ण वागणुकीत दिसले पाहिजे. फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीच्या पार्श्वभूमीवर शतकी परंपरा असलेल्या संस्थेला त्यांचे नाव मिळणे हा ऐतिहासिक योग आहे. स्त्रीशिक्षणाचा पाया रचणाऱ्या, सत्यशोधक समाजाची स्थापना करणाऱ्या आणि ‘शेतकऱ्याचा असूड’मधून शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठविणाऱ्या महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा संस्थेने जपावा, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

शासकीय निधीच्या मर्यादा असताना लोकसहभागातून उभारलेल्या भव्य वास्तूचे आणि त्यासाठी एका मुस्लिम बांधवाने दिलेल्या विनामोबदला योगदानाचे त्यांनी विशेष कौतुक केले. ‘मतदारसंघाच्या सीमा बदलल्या; पण मनातली रेषा बदलली नाही,’ अशा भावनिक शब्दांत एरंडोलकरांशी असलेले ऋणानुबंध उलगडत त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून भरीव मदत मिळेल, अशी ग्वाही दिली.

खते, रॉकेल व रेशनचे वितरण आणि कर्जपुरवठा करणाऱ्या सोसायट्यांनी बदलत्या काळानुसार व्यावसायिकतेची कास धरावी. बँका व सोसायट्यांकडील ठेवींचा नियमानुसार गृहकर्ज, अन्य कर्जे आणि व्यावसायिक प्रकल्पांसाठी विनियोग करून आर्थिक उलाढाल वाढवावी. सहकारात राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून संकटकाळात शेतकऱ्यांना आधार द्यावा. वेळेवर पीककर्ज, नियमित कर्जवसुली आणि विविध व्यवसायांच्या माध्यमातून सोसायट्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम बहुउद्देशीय सेवा केंद्रे म्हणून विकसित व्हावे, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. साडेनऊ कोटी रुपयांचे कर्जवाटप आणि ८० टक्क्यांहून अधिक कर्जवसुली केल्याबद्दल संचालक मंडळाचे अभिनंदन करत त्यांनी संस्थेच्या पुढील शतकातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्थेचे चेअरमन यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या शंभर वर्षांच्या संघर्षमय वाटचालीसह आर्थिक प्रगती आणि नूतन वास्तूच्या उभारणीवर प्रकाश टाकला.

यांची होती उपस्थिती –

यावेळी माजी आमदार महेंद्रसिंग पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन संजय पवार, शिवसेना संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, देविदास महाजन, किशोर काळकर, संस्थेचे चेअरमन राजेंद्र दोधू चौधरी, शताब्दी महोत्सव समितीचे प्रमुख विजय महाजन यांच्यासह आजी-माजी संचालक, कर्मचारी, सहकार क्षेत्रातील मान्यवर, सभासद आणि शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा: Pachora News: एनसीएमसी कार्डसाठी पाचोरा आगाराची विशेष मोहीम; तीन गावांत शिबिरांचे आयोजन

बातमी शेअर करा !
Share
Tags: erandol newserandol vividh karyakari sahakari societyminister chhagan bhujbalsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एरंडोलच्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा शताब्दी महोत्सव उत्साहात; नूतन वास्तूचे लोकार्पण, संस्थेचे महात्मा फुले यांच्या नावाने नामकरण

एरंडोलच्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा शताब्दी महोत्सव उत्साहात; नूतन वास्तूचे लोकार्पण, संस्थेचे महात्मा फुले यांच्या नावाने नामकरण

November 29, 2026
लासगाव येथे एनसीएमसी कार्ड शिबिर उत्साहात संपन्न, नागरिकांनी मानले आयोजकांचे आभार

लासगाव येथे एनसीएमसी कार्ड शिबिर उत्साहात संपन्न, नागरिकांनी मानले आयोजकांचे आभार

November 29, 2026
जळगावचा जलसंधारण पॅटर्न राज्यभर राबविणार; लोकसहभागातून दुष्काळमुक्तीसाठी प्रयत्न – मंत्री संजय राठोड

जळगावचा जलसंधारण पॅटर्न राज्यभर राबविणार; लोकसहभागातून दुष्काळमुक्तीसाठी प्रयत्न – मंत्री संजय राठोड

November 29, 2026
Pachora News: एनसीएमसी कार्डसाठी पाचोरा आगाराची विशेष मोहीम; तीन गावांत शिबिरांचे आयोजन

Pachora News: एनसीएमसी कार्डसाठी पाचोरा आगाराची विशेष मोहीम; तीन गावांत शिबिरांचे आयोजन

November 28, 2026
“संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक समाजघटकाची”, पाचोऱ्यातील ‘संविधान सन्मान जागर संवाद’मध्ये निखिल रांजणकर यांचे प्रतिपादन

“संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक समाजघटकाची”, पाचोऱ्यातील ‘संविधान सन्मान जागर संवाद’मध्ये निखिल रांजणकर यांचे प्रतिपादन

November 27, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीस भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेडची एक कोटींची मदत, बीव्हीजी, सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज

मुख्यमंत्री सहाय्यता निधीस भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेडची एक कोटींची मदत, बीव्हीजी, सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज

November 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page