भडगाव, 26 सप्टेंबर : भडगाव तालुक्यातील पावसाची परिस्थिती बिकडट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, यासाठी शेतकऱ्यांना मोबदला मिळवून द्यावा, अशी मागणी भडगाव तालुका प्रहार संघटना आणि तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. गुढे गावातील शेतकऱ्यांनी यासंबंधीचे निवेदनही तहसीलदारांना देण्यात आले आहे.
निवेदनात नेमकं काय म्हटलंय –
जवळजवळ भडगाव तालुक्यातील कोळगाव सर्कलला जून ते जुलैमध्ये 24 दिवस पावसाचा खंड पडला होता. त्यामुळे येथील पूर्ण सर्कलमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 18 सप्टेंबर 2023 पासून जो पाऊस चालू झाला त्या पावसामुळे सर्व प्रकारचे शेतातील पीक हे वाया गेलेले आहे. अति पावसामुळे शेतातील पिकाची पूर्णपणे नासधुस झाली आहे.
शेतकऱ्यांकडे असलेला पैसाही खर्च झाला असून त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परंतु आपण शासकीय स्तरावरुन आणेवारी ही जवळजवळ आमच्या भडगाव तालुक्याची 64 टक्के च्या वरती लावली असून हे मोजमाप कसे केले याचे आकलन आम्हाला झाले नसून सदरची आणेवारी कशी लावली याचे आम्हाला आपल्याकडून माहिती मिळावी, व सरसकट ज्यांनी ई पिक पाहणी लावलेली असेल किंवा नसेल किंवा ज्यांनी पीक विमा काढलेला असेल किंवा नसेल त्यांना सरसकट तुम्ही नुकसान भरपाई द्यावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
या शेतकऱ्यांनी दिले निवेदन –
विजय चौधरी, निलेश डहाळे, तुकाराम माळी, राहुल महाजन, प्रदीप एंडाईत, मच्छिंद्र मोरे, सागर माळी, प्रदीप डहाळे, गोपाल माळी, अमोल माळी, गुलाब मोरे, शांताराम जुलाल पा., अविनाश पा., खुशाल माळी, अर्जुन मोरे, हिम्मत महाजन, शशिकांत महाजन, गोरख माळी, अमोल गुलाब पाटील या सर्व शेतकऱ्यांनी हे निवेदन दिले.