• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

आरोग्य क्षेत्रात व्यापक प्रमाणात संशोधन होणे गरजेचे – कुलगुरु माधुरी कानिटकर (निवृत्त, लेफ्टनंट जनरल) यांचे प्रतिपादन

आरोग्य विज्ञान विद्यापीठात अविष्कार संशोधन महोत्सवाची प्राथमिक निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 5, 2023
in Uncategorized
आरोग्य क्षेत्रात व्यापक प्रमाणात संशोधन होणे गरजेचे – कुलगुरु माधुरी कानिटकर (निवृत्त, लेफ्टनंट जनरल) यांचे प्रतिपादन

नाशिक, 5 डिसेंबर : आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक होण्यासाठी संशोधनाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. याअनुषंगाने आरोग्य क्षेत्रातही व्यापक प्रमाणात संशोधन होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरु माधुरी कानिटकर (निवृत्त, लेफ्टनंट जनरल) प.वि.से.प., अ.वि.से.प.वि.से.प. यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ’अविष्कार-2023’ प्राथमिक निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाच्या कुलगुरु माधुरी कानिटकर (निवृत्त, लेफ्टनंट जनरल) यांनी केले.

याप्रसंगी मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील, प्राध्यापक डॉ. जयंत पळसकर, महेंद्र कोठावदे, बाळासाहेब पेंढारकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कुलगुरु माधुरी कानिटकर (निवृत्त, लेफ्टनंट जनरल) यांनी सांगितले की, संशोधन ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळण्यासाठी अविष्कार हे उत्तम व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांनी मर्यादित क्षेत्रात संशोधन न करता संशोधनाच्या सिमा वाढवाव्यात. सामाजिक दृष्टीकोन समोर ठेऊन संशोधन करावे. तंत्राज्ञानाच्या युगात संवाद आणि कौशल्य यांची सुसंगत मांडणी केल्यास प्रभावी संशोधन होईल. विद्यापीठाकडून संशोनधनासाठी मोठया प्रमाणात उपक्रम व निधी उपलब्ध करुन दिला जातो. समाजाची गरज लक्षात घेऊन उत्तम दर्जाचे संशोधन करावे असे त्यांनी सांगितले.

संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी आविष्कारची भूमीका महत्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांचा स्पर्धतील सहभाग ठराविक क्षेत्रापर्यंत मर्यादित नसून विद्यार्थ्यांसमवेत संवाद होणे गजचेचे आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यापीठाच्या संशोधन विषयक उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, ज्ञानाची व संशोधनाची पातळी उंचावत असतांना संवादाचे माध्यम महत्वपूर्ण भूमिका बजावते. विविध क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर मोठया प्रमाणात वाढला आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात मार्गदर्शकांच्या मदतीने योग्य संशोधन करावे जेणेकरुन समाजाला व सर्वांना त्याचा उपयोग होईल. विद्यापीठाचे नावलौकिक मोठे करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या संशोनधना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यापीठांचे कुलपती यांच्या प्रेरणेने ’अविष्कार’ संशोधन प्रकल्प महोत्सव सुरू करण्यात आला आहे. परीक्षकांनी नवोदित संशोधकांचे सर्वसामान्याना आरोग्याविषयी उपयुक्त ठरणाऱ्या चांगल्या प्रकारच्या शोध प्रकल्पाची निवड करावी. यासाठी विद्यापीठ अशा संशोधकांच्या संशोधनासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल असे त्यांनी सांगितले.

विद्यापीठस्तरीय प्राथमिक निवड चाचणी आविष्कार स्पर्धेत मानव्यविद्या भाषा व ललीतकला, वाणिज्य, व्यवस्थापन व विधी, विज्ञान, शेती आणि पशुसंवर्धन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वैद्यक व औषध निर्माणशास्त्र या सहा संवर्गामध्ये एकूण 100 पेक्षा अधिक महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आहे.

या मानव्यविद्या भाषा व ललीतकला संवर्गातील 85, वाणिज्य, व्यवस्थापन व विधी संवर्गात 20, शेती आणि पशुसंवर्धन संवर्गात 06, विज्ञान संवर्गातील 134 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे. प्रत्येक संवर्गातून सहभागी स्पर्धकांनी आपले संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण केले.
अविष्कार-2023 प्राथमिक निवड चाचणी स्पर्धेकरीता डॉ. परशुराम पवार, डॉ. अनया पत्रीकर, डॉ. अर्चना भास्करवार, डॉ. समिर घोलप, डॉ. त्रिवेणी काळे, डॉ. कमलेश बगमार, डॉ. शितल चव्हाण, डॉ. राजेश वानखेडे, डॉ. अपूर्व शिंपी, डॉ. अशोक वानकुंद्रे, डॉ. प्रशांत विश्वकर्मा, डॉ. जितेंद्र सिंग, डॉ. निता गांगुर्डे डॉ. निमाडे यांनी सहभागी स्पर्धकांचे परीक्षण केले.

अविष्कार प्राथमिक निवड चाचणी स्पर्धेकरीता विद्यापीठातील बाळासाहेब पेंढारकर, राजेश इस्ते, अविनाश सोनवणे, श्रीमती रेखा करवल आदींनी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला मोठया संख्येने विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: Chancellor Madhuri Kanitkarmadhuri kanitkarmadhuri kanitkar muhsmaharashtra university of health science

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘पती आमदार झाले अन् पत्नीने बालाजीला बोललेला नवस फेडला;’ अर्जुन खोतकर यांच्या फेसबूक पोस्टचा नेमका अर्थ काय?

‘पती आमदार झाले अन् पत्नीने बालाजीला बोललेला नवस फेडला;’ अर्जुन खोतकर यांच्या फेसबूक पोस्टचा नेमका अर्थ काय?

May 19, 2025
Video : लाडकी बहिण योजनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ठच सांगितलं, म्हणाले की, “ही योजना कधीही…”

Video : लाडकी बहिण योजनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ठच सांगितलं, म्हणाले की, “ही योजना कधीही…”

May 19, 2025
शेतकऱ्याचा ‘तो’ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल अन् केंद्रीय कृषीमंत्र्यांनी घेतली दखल; नेमकी बातमी काय?

शेतकऱ्याचा ‘तो’ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल अन् केंद्रीय कृषीमंत्र्यांनी घेतली दखल; नेमकी बातमी काय?

May 19, 2025
ऐन उन्हाळ्यात अवकाळीचा मारा; राज्यात आजपासून 25 मे पर्यंत सतर्कतेचा इशारा, जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज काय?

ऐन उन्हाळ्यात अवकाळीचा मारा; राज्यात आजपासून 25 मे पर्यंत सतर्कतेचा इशारा, जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज काय?

May 19, 2025
MP Smita Wagh : जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांच्यासह महाराष्ट्रातील ‘या’ सात खासदारांना संसदरत्न पुरस्कार जाहीर

MP Smita Wagh : जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांच्यासह महाराष्ट्रातील ‘या’ सात खासदारांना संसदरत्न पुरस्कार जाहीर

May 18, 2025
Video : ‘मुंबईत एक लाख प्रेक्षक क्षमतेचे स्टेडियम उभारणार;’ ‘एमसीए’ला प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन, मुख्यमंत्र्यांनी नेमकी घोषणा काय?

Video : ‘मुंबईत एक लाख प्रेक्षक क्षमतेचे स्टेडियम उभारणार;’ ‘एमसीए’ला प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन, मुख्यमंत्र्यांनी नेमकी घोषणा काय?

May 17, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page