• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

प्रभू श्रीरामचंद्रांच्या स्वागतासाठी सजली पाचोरा नगरी, भाजपचे अमोल शिंदे यांचे तर्फे विविध उपक्रम

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 21, 2024
in पाचोरा
प्रभू श्रीरामचंद्रांच्या स्वागतासाठी सजली पाचोरा नगरी, भाजपचे अमोल शिंदे यांचे तर्फे विविध उपक्रम

ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 21 जानेवारी : अयोध्या येथील भव्य राम मंदिरात उद्या, 22 जानेवारी (सोमवार) रोजी प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा उत्साहात संपन्न होत आहे. या ऐतिहासिक सुवर्णक्षणाचे स्वागत करण्यासाठी भाजपच्यावतीने रतीय जनता पार्टीच्या वतीने भाजप विधानसभा निवडणुक प्रमुख अमोल शिंदे यांच्या संकल्पनेतून पाचोरा नगरी सजविण्यात आली आहे. रामलल्लांचा संस्मरणीय प्राणप्रतिष्ठा समारोह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे.

पाचोरा शहरातील भडगाव रोड परिसर प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला आहे. येथील रस्ते दुभाजकावर केशरी कापडाच्या भव्य पताका व झेंडे लावून परिसर सुशोभित करण्यात आला आहे. ठिकठिकाणी कटआउट लावल्यामुळे भडगाव रोड परिसराचे सौंदर्य वाढले आहे.

पाचोरा शहरातील विविध चौकात प्रशस्त श्रीराम पूजन स्थळ (प्लॅटफॉर्म / मंडप)उभारले आहेत.प्रत्येक चौकात प्रभू श्रीरामांचे कटआउट व मंदिराची प्रतिमा ठेवण्यात आली आहे. दि. 22 रोजी दिवसभर शहरातील भाविक भक्तांना या ठिकाणी येऊन प्रभूश्रीराम व मंदिराचे पूजन करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.

तसेच शहरातील एकूण 28 मंदिरांमध्ये होणाऱ्या महाआरतीच्या वेळी पाचोरा भाजपा तर्फे 11 हजार रामकूट प्रसाद पॅकेट वाटप करण्यात येणार आहेत.या संपूर्ण उपक्रमांसाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सेवा देणार आहेत.

रांगोळी उपक्रम विशेष उल्लेखनीय –
श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभाच्या निमित्ताने पाचोरा शहरातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात 35 बाय 45 फूट आकाराची रांगोळी काढण्यात आली आहे. प्रभू श्रीरामचंद्र व राममंदिर प्रदर्शित करणाऱ्या या रांगोळीच्या निर्माणासाठी 120 किलोग्रॅम रांगोळी व अन्य घटकांचा वापर करण्यात आला आहे.

गालीचा, पोर्ट्रेट व कॅलिग्राफी अशा मिश्र प्रकाराच्या या रांगोळीसाठी 13 कलाकारांनी सतत 50 तास परिश्रम घेतले आहेत. शिंदे प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सुवर्णा पाटील ,श्रेयस सोनपूरकर व स्वाती महाजन यांचेसह 13 कलाकारांचे कौतुक होत आहे.

शहरातील सर्व श्रीराम भक्तांनी आपापल्या नजीकच्या चौकात जाऊन प्रभू श्रीरामाचे पूजन करावे, विविध मंदिरांमध्ये महाआरतीला उपस्थिती देऊन श्रीरामकुट प्रसादाचे ग्रहण करावे व रांगोळीतून साकारलेल्या श्रीरामलल्लाचे व मंदिराचे दर्शन घ्यावे, असे आवाहन अमोल शिंदे यांनी केले आहे.

हेही वाचा : शिवमहापुराण कथेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार उन्मेश पाटील यांचे केले कौतुक

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjp amol shinderam mandirram mandir ayodhyashree ram mandir

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page