चाळीसगाव, 24 जानेवारी : चाळीसगाव तालुक्यातील ओझरनजीक पोलिस कर्मचारी शुभम आगोसे याची हत्या करण्यात आली होती. दरम्यान, याप्रकरणी आधी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. दरम्यान, या पोलिस कर्मचाऱ्याच्या खूनप्रकरणी आणखी एकास अटक करण्यात आली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण ? –
चाळीसगाव येथील पीर मुसा कादरी बाबा दर्गा जवळ पाटणादेवी नाक्याजवळ 14 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मुंबई पोलिस दलात पोलिस कर्मचारी असलेल्या शुभम आगोणे या तरुणावर काही जणांनी धारदार शस्त्राने वार करीत हल्ला केल्याची धक्कादायक घडली होती. या घटनेत शुभम गंभीर जखमी झाल्याने त्याचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. दरम्यान, क्रिकेट स्पर्धेत झालेल्या वादातून त्याचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.
चौथ्या आरोपीस अटक –
मुंबई पोलिस दलातील कर्मचारी शुभम आगोने याच्या हत्येप्रकरणी आधी तिघांना अटक केली होती. यातील इतर आरोपी फरार होते. त्यापैकी विष्णू कोळी (वय 28, चाळीसगाव) यास स्थानिक गुन्हे शाखा जळगावच्या पथकाने सोमवारी रात्री जामनेर येथून ताब्यात घेऊन चाळीसगाव शहर पोलिसांकडे सुपुर्द केले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना झाली आहे.
हेही वाचा : Crime News : जामनेर तालुक्यातील सरपंच पतीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांनी केले गंभीर आरोप…