• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे…”, देवेंद्र फडणवीसांचे ठाकरेंना प्रत्युत्तर, काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 10, 2024
in महाराष्ट्र
“उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे…”, देवेंद्र फडणवीसांचे ठाकरेंना प्रत्युत्तर, काय म्हणाले?

नाशिक येथे माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

मुंबई : राज्यातील वाढत्या गुन्हेगारी संदर्भात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे का, असा सवाल करत त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. यानंतर उद्धव ठाकरे केलेल्या टिकेला देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, या शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. नाशिक येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी हे प्रत्युत्तर दिले.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस –

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देताना म्हटले की, “पहिल्यांदा तर मला असं वाटतं की, त्यांची जी भाषा आणि त्यांचे जे शब्द आहेत, ते पाहिल्यानंतर आता माझं ठाम मत झालेलं आहे की, उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मी आता एवढंच बोलेन गेट वेल सून. मी त्यांच्या कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणार नाही. मी एवढीच ईश्वराला प्रार्थना करेन आणि त्यांना म्हणेन उद्धवजी गेट वेल सून”, या शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे –

ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाल्यानंतर सध्या राज्यात राजकीय वातावरण तापलेले आहे. गृहखात्यावर विरोधकांच्या वतीने जोरदा टीका करण्यात येत आहे. यावर उत्तर देताना आमच्या विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे, अगदी एखाद्या गाडीखाली श्वान आला तरी ते त्याठिकाणी गृहमंत्र्याचा राजीनामा मागतील, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. फडणवीस यांच्या या विधानानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून या महाराष्ट्रात गुंडांचा जो हैदोस सुरू आहे, असा हैदोस असं नाही की यापूर्वी महाराष्ट्रात झाला नव्हता. पण ते गँगवॉर दोन गँगमधील गँगवॉर होतं. आता मात्र, सरकारमध्ये गँगवॉर आलं आहे. ज्या पद्धतीने सरकारच्या आश्रयाने ही गुंडगिरी सुरू आहे, या गुंडांचे वेळोवेळी मंत्र्यांसोबतचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत, या गुड्यांना मिळणारे संरक्षण हा चितेंचा विषय आहे.

कालच देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केले. मी त्यांना कलंक बोललो, फडतूस बोललो, आता माझ्याकडे शब्द नाहीत. म्हणजे कलंक, फडतूस हे फारच सौम्य शब्द झाले. पण निर्घृण आणि असं वाटायला लागलं आहे की, यांची मानसिक तपासणी करावी की काय, आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे का, अशीच कालची त्यांची प्रतिक्रिया होती. अत्यंत संतापनजक होती. फडणवीस जे बोलले की, उद्या एखाद्या गाडीखाली कुत्र्याचं पिल्लू, मला वाटलं त्यांनी श्वान शब्द वापरला. नुसता संस्कृत शब्द वापरला म्हणजे सुसंस्कृत होत नाही. हा सुसंस्कृत नाही, हा निर्ढावलेला, निर्घृण मनाचा, अत्यंत निर्दयी मनाचा गृहमंत्री आहे. गृहमंत्री म्हटल्यावर राज्याच्या कुत्र्याच्या, सर्व प्राण्यांच्या जीवाची जबाबदारी ही तुमच्याकडेच येते. माणसांच्या जबाबदारीची तर एक वेगळीच बाब आहे. एक हत्या होत असताना तुम्ही त्याची बरोबरी श्वानाबरोबर करता, असा सवालही त्यांनी केला.

बातमी शेअर करा !
Share
Tags: devendra fadnavisdevendra fadnavis latest newsdevendra fadnavis on uddhav thackeraymaharashtra politicsuddhav thackeray

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाण्याचा वाहून जाणारा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील

पाण्याचा वाहून जाणारा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 21, 2026
जळगावच्या जिल्हा परिषद सीईओंची तत्परता; समाजमंदिरात राहणाऱ्या राजू भालेरावांच्या खात्यात घरकुलाचा पहिला हप्ता जमा

जळगावच्या जिल्हा परिषद सीईओंची तत्परता; समाजमंदिरात राहणाऱ्या राजू भालेरावांच्या खात्यात घरकुलाचा पहिला हप्ता जमा

August 20, 2026
तरुण पिढीला नशेच्या दुष्टचक्रात जाण्यापासून रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तरुण पिढीला नशेच्या दुष्टचक्रात जाण्यापासून रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 20, 2026
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! इयत्ता 1 ली ते 8 वीला आता मिळणार मोफत दप्तर

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! इयत्ता 1 ली ते 8 वीला आता मिळणार मोफत दप्तर

August 20, 2026
Jalgaon News: जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-2026 चे 21 ऑगस्ट रोजी जळगाव येथे आयोजन

Jalgaon News: जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-2026 चे 21 ऑगस्ट रोजी जळगाव येथे आयोजन

August 19, 2026
PM E-Bus Sewa: पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश

PM E-Bus Sewa: पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश

August 19, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page