भडगाव, 13 फेब्रुवारी : पाचोऱ्यात आजवर चार ते पाच सभा अतिशय उदंड उत्साहात पार पडल्या असून याचप्रमाणे भडगावातील पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांची होणारी सभा ही ऐतिहासिक पद्धतीत पार पडेल, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी व्यक्त केला. त्यांनी भडगाव येथील सभास्थळी भेट देऊन कामाचा आढावा घेत पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला.
काय म्हणाल्या वैशाली सुर्यवंशी –
भडगाव येथे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा गुरूवारी पार पडणार आहे. याच्या नियोजनासाठी आज वैशालीताई सुर्यवंशी यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. याप्रसंगी त्या म्हणाल्या की, शिवसेना पक्षात गद्दारी झाल्यानंतर वडील उध्दव ठाकरे हे संकटात असल्याचे पाहून युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे पायाला भिंगरी बांधल्यासारखे राज्यभरात दौरे सुरू केले आहेत. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. दोन वर्षांपूर्वीचे आदित्य ठाकरे आणि आताचे अदित्य ठाकरे यात मोठा फरक झाला आहे. आपल्या वडीलांची तब्येतीकडे लक्ष देवून त्यांनी स्वत: आता मैदानात उतरून निष्ठा यात्रेला सुरूवात केली आहे.
गुरूवार 15 फेब्रुवारी रोजी आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाई यांचा जिल्हा दौरा जळगाव ग्रामीण पासून होत आहे. त्यानंतर भडगाव शहरात त्यांची सभा होणार आहे. ही सभा यशस्वी होण्यासाठी अचुक नियोजन करण्यासाठी प्रत्येक बुथच्या युवा कार्यकर्त्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी वैशाली सुर्यवंशी यांनी केला. याप्रसंगी शिवसेना युवासेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होती.
हेही वाचा : मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपात पक्षप्रवेश