• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जिल्हास्तरीय वनहक्क समितीच्या बैठकीत 39 हेक्टरपेक्षा जास्त वनहक्क दावे मंजूर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 22, 2024
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जिल्हास्तरीय वनहक्क समितीच्या बैठकीत 39 हेक्टरपेक्षा जास्त वनहक्क दावे मंजूर

जळगाव दि. 22 फेब्रुवारी : जळगाव जिल्ह्यातील वैयक्तिक वनहक्क दावेदारांच्या दाव्यांना मान्यता देण्यात आली असून दावेदारांना एकूण 39.891 हेक्टर आर जमीनीचे वनपट्टे मंजुर करण्यात आले आहेत. प्रलंबित उर्वरित वनदावेदारांचे दावे तात्काळ कार्यवाही करुन निकाली काढण्यात येतील. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार याबाबत निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

21 फेब्रुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत पाच महत्वाचे मुद्दे 7/12, अनुसूचिचे वाटप करणे, मनरेगा अंतर्गत लाभ देणे, जमीन मोजणी करणे, किसान क्रेडिट कार्ड, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत लाभ देण्यासाठीही मान्यता देण्यात आली.

आदि मित्रच्या माध्यमातून होणार काम –

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जिल्हा नियोजन समिती, आदिवासी विकास प्रकल्प यावल यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात 12 फेब्रुवारी रोजी एकदिवसीय क्षेत्र कार्यकर्ता (आदिमित्र) प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये क्षेत्र कार्यकर्ता विद्यार्थ्यास आदिमित्र म्हणून नियुक्त करण्यात आले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून आदिवासी विकास प्रकल्प यावल पेसा क्षेत्र गावांच्या गरजांवर आधारित अभ्यास करण्यासाठी वरीलप्रमाणे कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात आले. आदिमित्र यांना जिल्ह्यातील आदिवासा पेसा अंतर्गत असलेल्या 63 गावांचा पी.आर.ए. तंत्राच्या माध्यमातून अभ्यास करण्यासाठी तसेच आदिवासी कुटूंबांना वैयक्तिक लाभाचे अर्ज भरून घेण्या बाबतचे प्रशिक्षण देण्यात आले.

लाभार्थ्यास योजनेसाठी आवश्यक ती माहिती देऊन आवश्यक ते सर्व कागदपत्रे घेऊन ज्या विभागाचे लाभा असेल ते सर्व कागदपत्रे आदिमित्रांकडून एकत्र करुन आदिवासी विकास विभागामार्फत संबंधित विभागास दिले जाणार आहेत. गावांच्या समस्यांचा अभ्यास क गावाचा विकास आराखडा तयार करुन संबंधित विभागास सादर करण्यात येईल. यासोबतच वरीलप्रमाणे वैयक्तिक वनहक्कधारक व मंजुर 2 वनहक्क दाव्यांना 5 बाबींची हमी देण्यात येत आहे.

तसेच सामूहिक वनहक्क दाव्यांतील जमीनींचा विकासात्मक दृष्टीकोनातून डी.पी.आर. करण्यात येईल व त्यादृष्टीने वैयक्तिक व सामूहिक वनहक्क धारकांना वरील 5 बाबींची हमी देऊन जास्तीत जास्त लाभ मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
आतापर्यंत 196 सामूहिक वनहक्क दावे मंजूर करण्यात आलेले आहेत यातील प्रत्येक गावाचा( डीपीआर) ग्रामविकास आराखडा तयार करण्यात येणार आहे त्यानुसार गावा मध्ये कन्वर्जन्स च्या माध्यमातून विविध विभागाच्या योजना राबवून गावामध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली.

हेही वाचा : ‘या’ तारखेला असा रास्ता रोको करा की भारतात असा कधीच झाला नसेल, मनोज जरांगे यांचे समाजाला आवाहन

बातमी शेअर करा !
Share
Tags: forest department jalgaonias ayush prasadjalgaon news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जाहिरातीतून एसटी कमविणार 250 कोटी रुपये; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

जाहिरातीतून एसटी कमविणार 250 कोटी रुपये; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

March 3, 2026
भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

March 3, 2026
चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

March 2, 2026
मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page