सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 26 फेब्रुवारी : जिल्ह्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच पारोळा तालुक्यातून अपघाताची बातमी समोर आली आहे. पारोळा तालुक्यातील मोंढाळे गावाजवळ दुचाकी घसरल्याने अपघात झाला. या अपघातात तीन जखमी झाल्याची घटना घडली.
काय आहे संपूर्ण बातमी? –
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पारोळा तालुक्यातील मोंढाळे गावाजवळ दुचाकी घसरल्याने अपघात झाला. या अपघातात तीन जखमी झाल्याची घटना रविवारी, 25 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता घडली. दगडीतील इंदुबाई गोरख जोगी (वय 60), प्रभू प्रल्हाद जोगी (वय 25), राहुल प्रभू जोगी (5 वर्ष) हे दुचाकीने पारोळ्याकडे येत असताना पुढे बसलेल्या राहुलने अचानक पुढचा ब्रेक दाबल्याने गाडी घसरली.
यामध्ये इंदुबाई यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे तर प्रभू याच्या डोळ्यास व हात पायांना गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे.
हेही वाचा : संचारबंदी उठवा सागर बंगल्यावर आलोच समजा! मनोज जरांगे माघारी, आज नेमकं काय घडलं?