शिरसगाव (चाळीसगाव), 6 मार्च : शिरसगाव येथील दिलीप फकिरा पाटील यांनी मन्याड धरण संदर्भातील मागण्या पुर्ण होण्यासाठी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. उद्या, 7 मार्चपासून ते शिरसगाव येथे आमरण उपोषणास बसणार आहेत.
काय आहे संपूर्ण बातमी? –
शिरसगाव येथील दिलीप पाटील यांनी आमरण उपोषणाबाबत माहिती दिली की, मन्याड धरण संदर्भातील मागण्या पुर्ण होण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन 27 फेब्रुवारी रोजी प्रशासनाला निवदेन देत आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाने याबाबत अद्याप कोणताही संपर्क केला नाही. दरम्यान, उद्यापासून आमरण उपोषण करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी एकजूट दाखवत मला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
काय आहेत मागण्या? –
- मन्याड धरणाच्या मुख्य मागण्या खालीलप्रमाणे –
- गिरणा मन्याड नदी जोड प्रकल्प करून मन्याड धरणात पाणी टाकणे.
- गिरणा धरण पावसाळ्यात फुल झाल्यावर ओव्हर फ्लो होणारे पाणी मण्याड धरणात टाकणे.
- मन्याड धरणाची उंची वाढवणे.
- कॅनॉलची दुरुस्ती करणे.
शेतकरी संबंधीत मागण्या खालीलप्रमाणे –
- कापसाला 15 हजार रू. भाव मिळण्यात यावा.
- चाळीसगाव तालुका दुष्काळ जाहीर झाला असून तरी शेतकऱ्यास कुठल्याही प्रकारच्या सवलती लागू नाही. त्या त्वरित लागू करण्यात याव्यात.
- शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा 12 तास वीज पुरवठा मिळणे.
- जळालेले ट्रान्सफार्मर दोन दिवसात बदलुन मिळावा.
- भाजीपाला व फळे यांची आडत व कट्टी बंद असतानाही आडत व कट्टी घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी.
- शेतकऱ्यांच्या मुख्य पिकांना भाव देण्यात यावा.
- दुधाला योग्य भावा मिळावा.
- रासायनिक खतांच्या व बियाण्यांची दरवाढ कमी करणे.
हेही वाचा : पारोळा येथे जगद्गुरू श्री. संत तुकाराम महाराज चौक सुशोभिकरणाचा भव्य लोकापर्ण सोहळा