• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मुतखड्यासाठी आता जळगावात अद्यावत मशीन, रूग्णांचे हजारो रूपये वाचणार, काय आहे संपूर्ण बातमी? –

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
March 16, 2024
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
मुतखड्यासाठी आता जळगावात अद्यावत मशीन, रूग्णांचे हजारो रूपये वाचणार, काय आहे संपूर्ण बातमी? –

जळगाव, 16 मार्च : जळगाव जिल्ह्यातील आरोग्य सुविधा मजबूत व्हाव्यात, यासाठी जिल्हा नियोजनच्या निधीतून अनेक उपकरण घेतली जे महाराष्ट्रात इतरत्र नाहीत. आता मुतखडयासाठी नव्या पिढीतील तंत्रज्ञान असलेले ‘स्पार्क एक्स्ट्राकॉर्पोरियअल शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी’ ही अद्यावत मशीनही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दिली. अशी अद्यावत मशीन उत्तर महाराष्ट्रामध्ये कुठेच नाही ती जळगाव मध्ये बसविण्यात आली आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील याच्या हस्ते लोकार्पण –

कोणतीही वेदना होणार नाही अशी ही मशीन काही सेंकदात मुतखडा फोडते आणि तें लघवी वाटे विना अडथळा बाहेर पडते. फक्त एक पॅरासिटॉमॉल गोळी खाऊन रुग्ण घरी जाऊ शकतो, असे तज्ञ डॉक्टरांनी आपल्याला सांगितले. आता मुतखड्याच्या ऑपरेशनसाठी गोरगरीबाला हजारो रुपये मोजावे लागणार नाहीत. अशी सोय जळगाव मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्याचे आपल्याला समाधान असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलून दाखविली.

जिल्हा वार्षिक योजना निधी अंतर्गत मंजूर झालेल्या ‘ ई. एस.डब्लु. एल. सेंटर ऑफ एक्सलन्स ‘ चे उदघाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील, अरविंद देशमुख, तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

या नव्या यंत्राद्वारे होणारी एक विना-शस्त्रक्रिया प्रक्रिया आहे. जी मूत्रमार्गाच्या काही भागांमध्ये मुतखडे फोडण्यासाठी शॉकवेव्ह वापरते. शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी हा किडनी स्टोनसाठी एक सामान्य उपचार आहे. कधीकधी या प्रक्रियेला स्पार्क एक्स्ट्राकॉर्पोरियअल शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी (Spark EM ESWL) म्हणतात. शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी मुतखडे फोडण्यासाठी उच्च-उर्जा शॉक (उच्चदाब) लहरी वापरते.
किडनी स्टोनचे छोटे तुकडे नंतर मूत्रमार्गात अधिक सहजतेने जाऊ शकतात. शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी रुग्णाची वेदना कमी करण्यात मदत करु शकते. मूत्रपिंडातील (किडणी) मुतखडे काढून टाकण्यासाठी अधिक आक्रमक शस्त्रक्रिया टाळण्यात ते मदत करु शकते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगांव संस्थेमध्ये नवीनतम पिढीतील इलेक्ट्रोमॅग्नेटिक शॉकवेव्ह एमिटर टेक्नॉलॉजी (Spark EM ESWL) सह ही सर्वात स्वस्त आणि जागतिक दर्जाचे उत्पादन आहे. जे मत्रपिंड आणि मुत्राशयातील मुतखडे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यास मदत करते. स्पार्क हे जागतिक उत्पादन आहे आणि कंपनी जगभरातील 50+ पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात करते. सदर कंपनी ISO13485 आणि CE1984 प्रमाणक आणि गुणवत्ता व्यवस्थपन मान 9001:2008 सह उत्पादन प्रदान करते, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली.

हेही वाचा : आचारसंहिता म्हणजे नेमकं काय, आजपासून ती लागू झाल्यावर काय बदल होतील?

बातमी शेअर करा !
Share
Tags: advanced kidney stones treatment machinegulabrao patilmedical college jalgaon

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page