ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 17 मार्च : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांसह प्रशासनाच्या कामाला वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह तालुक्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यानिमित्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचे आवाहन केले आहे.
काय म्हणाले प्रांताधिकारी –
प्रांताअधिकारी भूषण अहिरे यांनी पत्रकारांसोबत संवाद साधत सांगितले की, लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य करावे. वयोवृद्ध महिला-पुरुष किंवा दिव्यांग (ज्यांना चालायला त्रास होतो) अशा व्यक्तींसाठी शासनामार्फत घरोघरी जाऊन त्यांना घरीच मतदानाचा हक्क बजविता येणार आहे. मतदान हा नागरिकांचा मूलभूत हक्क असून तो त्यांनी बजावलाच पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
लोकसभा निवडणुकीच्या काळात कुठेही अनुचित प्रकार घडल्यास ताबडतोब पोलिसांसोबत संपर्क साधावा. तसेच निवडणुकीच्या काळात पत्रकारांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा : आचारसंहिता म्हणजे नेमकं काय, आजपासून ती लागू झाल्यावर काय बदल होतील?