जळगाव/मुंबई, 29 मार्च : गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असताना आज सकाळपासून पुन्हा एकदा हवामानातील बदलास सुरूवात झाली आहे. आज सकाळपासून ठिकठिकाणी ढगाळ वातावरण असल्याने पुढील काही तासात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
मार्च महिन्याच्या अखेरीस कडाक्याच्या उन्ह्याळ्यास सुरूवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात उन्हाचा पारा 40 अंश सेल्सिअसचा पार गेला आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबारसह नाशिक जिल्ह्यात तूरळक पावसाची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना हवामाने विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह 30-40 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे तसेच पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुढील 3 ते 4 तास घराबाहेर पडताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
ढगाळ वातावरणाचा अंदाज –
गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पारा वाढल्याने गुरूवारी जळगावच्या तापमानाने यंदाच्या हंगामातील उच्चांक गाठला. गुरूवारी, जळगावचे 41.8 अंशावर गेल्याने देशातील पहिल्या पाच शहरांमध्ये जळगावाचा चौथ्या तर राज्यात तिसरा क्रमांक होता. दरम्यान, आगामी काही दिवस जळगाव जिल्ह्यात काही अंशी ढगाळ वातारवरणाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
हेही वाचा : केळी पिक विम्याबाबतची नुकसान भरपाई संदर्भात खासदार उन्मेष पाटील यांनी दिली महत्वाची माहिती