• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पंजाबराव डख लोकसभा निवडणूक लढवणार, हवामानाप्रमाणेच विजयाचा अंदाज खरा ठरणार का?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 31, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
पंजाबराव डख लोकसभा निवडणूक लढवणार, हवामानाप्रमाणेच विजयाचा अंदाज खरा ठरणार का?

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

परभणी, 31 मार्च : हवामानविषयक अंदाज सांगणारे आणि त्या अंदाजामुळे राज्यातील असंख्य शेतकऱ्यांचे परिचित असलेले पंजाबराव डख यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निश्चय व्यक्त केला आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढणार आहेत. या पार्श्वभूमीवर हवामानाचा अंदाज खरा ठरविणाऱ्या पंजाबराव डख यांचा विजयाचा अंदाज खरा ठरणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

काय संपूर्ण बातमी? –
हवामानविषयक माहिती देत शेतकऱ्यांच्या मते अचूक अंदाज सांगणारे पंजाबराव डख यांना सध्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. पंजाबराव डख यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दाखविली आहे. दरम्यान, त्यांच्या या निर्णयामुळे परभणी मतदारसंघात मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कोण आहेत पंजाबराव डख –
पंजाबराव डख हे हवामानाविषयक माहिती देण्यासाठी परिचित आहेत. पंजाबराव डख हे शेतकऱ्यांना पेरणी कधी करावी, हवामान काय असू शकते याबाबतची माहिती देत असतात. यासाठी ते त्यांच्या समाजमाध्यमांचा वापर करत शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहचवित असतात. तसेच बदलत्या हवामानाबाबत ते नवनवीन माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवत असतात. दरम्यान, महाराष्ट्रात पंजाबराव डख यांनी सांगितलेल्या हवामानाच्या अंदाजावर अनेक शेतकरी- नागरिक विश्वास ठेवतात. यामुळे डख हे समाजमाध्यमांवर प्रसिद्ध आहेत.

परभणी लोकसभा मतदारसंघ –
परभणी लोकसभा मतदारसंघात सध्यास्थिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय जाधव विद्यमान खासदार आहेत. त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाल्याने ते पुन्हा एकदा खासदारकीच्या मैदानात उतरणार आहेत. तर दुसरीकडे रासपचे महादेव जानकर यांना महायुतीकडून उमेदवारी घोषित करण्यात आली असून संजय जाधव यांच्याविरोधात त्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. दरम्यान, संजय जाधव आणि महादेव जानकर यांच्या दोघांच्या लढतीत आता पंजाबराव डख यांनी उडी घेतली. पंजाबराव डख लोकसभा निवडणूक लढणार असून त्या अनुषंगाने त्यांनी तयारीला सुरूवात केली आहे.

हेही वाचा : काल, आमदारकीचा राजीनामा आणि आज थेट मिळाले लोकसभेचे तिकीट, निलेश लंके सुजय विखेंविरोधात निवडणुकीच्या रिंगणात

बातमी शेअर करा !
Share
Tags: Lok Sabha Electionslok sabha elections 2024Parbhani Lok Sabha ConstituencyPunjabrao Dakh

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page