कोल्हापूर, 31 मार्च : देशात सध्या आयपीएलचा हंगाम सुरू आहे. यामुळे क्रिकेटचाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या सामन्यादरम्यान किंवा सामन्यानंतर क्रिकेटप्रेमींमध्ये आयपीएलच्या घडामोडींवर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगताना दिसतात. मात्र, काहीवेळी या चर्चांचे थेट वादात रूपांतर होते. असाच प्रकार कोल्हापूरातून समोर आला आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
आयपीएलच्या सध्या सुरू असलेल्या हंगामात हैदराबाद विरूद्ध मुंबईचा सामना बुधवार रोजी पार पडला. या सामन्यात हैदराबाद संघातील खेळाडूंनी अक्षरशः धावांचा पाऊस पाडत एका सामन्यात सर्वाधिक धावांचा विक्रम करत 277 धावांचे आव्हान दिले होते. दरम्यान, एवढी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना स्फोटक फलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा सलामीवीर रोहित शर्मा याच्याकडून एमआयच्या समर्थकांच्या मोठ्या अपेक्षा व्यक्त केला जात होत्या. या सामान्यात रोहित शर्माने 12 चेंडूत 26 धावांची खेळी केली.
कोल्हापूरात एका ठिकाणी ही मॅच पाहिली जात होती. दरम्यान, या सामन्यात रोहित शर्मा बाद होताच चेन्नई सुपर किंग्जचे चाहते बंडोपंत बापूसो तिबिले (वय 63, रा. हणमंतवाडी) त्याठिकाणी पोहोचले. यावेळी त्यांनी रोहित शर्मा आऊट झाल्याने मुंबई कशी जिंकणार? असे म्हणत आनंद व्यक्त केला होता. यावेळी रागावलेल्या बळवंत आणि सागर यांनी डोक्यात हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. तिबिले यांना तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मारहाण करणाऱ्या बळवंत महादेव झांजगे (वय 50) आणि सागर सदाशिव झांजगे (वय 35, दोघे रा. हणमंतवाडी) यांना करवीर पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, एका आयपीएल सामन्याने एकाचा हकनाक बळी गेला आहे.
हेही वाचा : पंजाबराव डख लोकसभा निवडणूक लढवणार, हवामानाप्रमाणेच विजयाचा अंदाज खरा ठरणार का?