सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 5 एप्रिल : पारोळा तालुक्यात ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई समस्या निर्माण होत असल्यामुळे तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या 28 योजना तत्काळ सुरू कराव्यात अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी दिल्या. तसेच पाणीयोजनांच्या वीजपुरवठ्यासाठी वीज वितरण कंपनीकडे त्वरित मागणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. खेडी ढोक (ता. पारोळा) श्री अंकित यांनी भेट दिली. त्यानंतर तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत अनिकेत पाटील, गटविकास अधिकारी किशोर शिंदे, अभियंता धीरज पाटील, विस्तार अधिकारी सुनील पाटील, शाखा अभियंता संदीप सोनवणे, ग्रामसेवक व सरपंच उपस्थित होते.
आढावा घेत असताना तालुक्यात पाणीटंचाई सदृश्य गावांची पाहणी करून माहिती तयार करा आणि तसे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवा ग्रामस्थांना कुठल्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. खेडीढोक गावात 6 मार्चपासून सुरवातीला दोन टँकर सुरू केले होते परंतु आज दररोज चार टँकर पाणीपुरवठा केला जात आहे पाणीपुरवठा होतो त्या विहिरीचेही परीक्षण मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी केले.
हेही वाचा : Pachora News : पाचोरा रेल्वे स्थानकावर उन्मेष पाटील व करण पवारांचे भव्य स्वागत