मुंबई, 10 एप्रिल : देशात मे महिन्याच्या अखेरीस नैऋत्येकडून दाखल होणाऱ्या मान्सूनची शेतकऱ्यांना नेहमी आतुरता असते. दरम्यान, हवामान अंदाजाविषयक माहिती देणाऱ्या स्कायमेट या संस्थेने मान्सून बाबतची मोठी अपडेट दिली आहे.
काय आहे स्कायमेटचा अंदाज? –
गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने अनेक भागात सध्या पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र, यंदाच्या मान्सूनमध्ये पाण्याच्या समस्येपासून दिलासा मिळणार आहे. कारण, यंदा मान्सूनमध्ये चांगला आणि सरासरीप्रमाणे सामान्य पाऊस होण्याचा अंदाज स्कायमेट या हवामानविषयक संस्थेने वर्तवला आहे.
यंदा चांगल्या पावसाचा अंदाज –
स्कायमेट वेदर या हवामानाचा अंदाज देणाऱ्या संस्थेच्या दिलेल्या अहवालानुसार, यंदा समाधानकारक मान्सून पाहायला मिळेल. यंदा पावसाळ्यात पर्जन्यमान चांगले राहण्याची शक्यता या अहवालानुसार वर्तविण्यात आलेली आहे. नेहमीच्या सरासरी च्या 102 टक्के म्हणजे सर्वसाधारण पाऊस पडेल, असा अंदाजही स्कायमेट वेदरने वर्तवला आहे. एल निनोचे ला निनो मध्ये रुपांतर होत असल्याने महाराष्ट्राच्या अवर्षणग्रस्त भागातही चांगल्या पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.
हेही वाचा : Success Story : सलग 4 वेळा अपयश, पण चोपड्याच्या वैभवीनं करुन दाखवलं! शेवटी सरकारी अधिकारी झालीच!