जळगाव, 13 एप्रिल : जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी विविध पद्धतीने मतदान जनजागृती करण्यात येत असतानाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभात वधू वरासह वऱ्हाडी मंडळीनी घेतली मतदानाची शपथ घेतली.
वऱ्हाडी मंडळीनी घेतली मतदानाची शपथ –
जळगाव जिल्ह्यातील म्हसावद येथे लग्नसमारंभात मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या लग्न समारंभात वधू वरासह वऱ्हाडी मंडळीनी घेतली मतदानाची शपथ घेतली. रमेश आनंदा चिंचोरे यांचे सुपुत्र चि. जिग्नेश आणि मोहन शंकर कंखरे यांची सुकन्या चिन्मयी यांचा शुभविवाह म्हसावद येथे संपन्न झाला.
दरम्यान, या विवाहप्रसंगी स्वीप उपक्रमांतर्गत मतदानाची शपथ वाचन थेपडे विद्यालय म्हसावद तर्फे योगराज चिंचोरे यांनी केले. त्यांच्या सोबत वर-वधू ,उपस्थित सर्व वर्हाडी मंडळी, ग्रामस्थ यांनी शपथ घेऊन मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याचा निश्चय केला. यावेळी थेपडे विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. डी. चौधरी, उपमुख्याध्यापक जी. डी. बच्छाव, सी. एम. राजपूत, पी. पी. मगरे, क्रीडा शिक्षक राहूल गिरासे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार उपस्थित होते.
हेही वाचा : अमळनेर येथे विद्यार्थी बनले मतदार प्रबोधन दूत, मतदानाच्या जनजागृतीसाठी नेमका काय आहे हा अभिनव उपक्रम?