चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली, 14 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ‘मोदी की गँरंटी भाजपचा संकल्प’ या नावाने भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
‘मोदी की गँरंटी भाजपचा संकल्प’ –
नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात आज भाजपचे संकल्प पत्र प्रसिद्ध करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते. भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्याला ‘मोदी की गँरंटी भाजपचा संकल्प’ असे नाव देण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्त हा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला. या जाहीरनाम्यात उद्योजकता, रोजगाराच्या संधी, महिला सक्षमीकरण आणि शेतकरी यांच्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
भाजपच्या जाहीरनाम्यातील ठळक घोषणा –
- गरीबांसाठी चार कोटी घरे बांधण्यात येणार.
- पाईपमार्फत स्वस्त गॅस घराघरात पोहोचवण्याची घोषणा.
- वीजबिल शून्य करण्यासाठी काम करणार, कोट्यवधी कुटुंबांचे वीज बिल शून्यावर आणण्यासाठी आणि विजेपासून कमाईच्यासंधी निर्माण करण्यासाठी आम्ही काम करण्यात येणार. यासाठी पीएम सूर्य घर मोफत वीज योजना लागू करण्यात येणार.
- विजेचे माध्यमातून उत्पन्न मिळविण्यासाठी संधी निर्माण करण्यात येतील.
- गरीबांसाठी अनेक योजनांचा विस्तार करण्यात येईल.
- ‘पीएम किसान’ योजनेचा लाभ 10 कोटी शेतकऱ्यांना या पुढेही मिळणार.
- कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष, देशात फूड प्रोसेसिंग हब बनणार, नॅनो युरियाच्या वापरावर भर देणार.
- रोजगार आणि उद्योजकतेभर भर देण्यात येणार.
- मोफत रेशन योजना ही पुढील पाच वर्ष सुरु राहणार आहे.
- महिलांसक्षमीकरणासाठी 3 कोटी महिलांना लखपती दिदी करणार, महिलांना आयटी, टुरिझमकडे वळवणार, सर्व्हायकल कॅन्सरच्या उपचारावर भर देण्यात येणार.
- मुद्रा योजना 10 लाखांवरून 20 लाखांवर, मुद्रा योजनेंतर्गत यापूर्वी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात होते. आता ही मर्यादा वाढवून 20 लाख करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे.
- आयुषमान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत विमा आणि मोफत उपचार आणि 70 वर्षांवरील वृद्धांना आयुषमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच तृतीयपंथीयांना आयुषमान भारत योजनेचा लाभ मिळणार.
- महिला खेळाडूंसाठी त्यांच्या लक्षपर्यंत पोहचविण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार. तसेच त्यांना विविध सुविधा प्राप्त करून देण्यात येतील.
- नमो ड्रोण दिदी योजनेअंतर्गत गावागावांमध्ये महिला ड्रोन पायलट बनणार.
हेही वाचा : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध, जाणून घ्या ठळक मुद्दे