• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी यंत्रणा सज्ज; उद्या, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात होणार मतदान

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 18, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, देश-विदेश, ब्रेकिंग
पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी यंत्रणा सज्ज; उद्या, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात होणार मतदान

मुंबई, 17 एप्रिल : महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदार संघामध्ये दि. 19 एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

मतदानासाठी यंत्रणा सज्ज –
लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी एकूण 10,652 मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दरम्यान, या निवडणुकीत 95,54,667 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यासाठी बॅलेट युनिट (बीयु) 21,527 तर कंट्रोल युनिट (सीयु) 13,963 आणि 14,755 व्हीव्हीपॅट उपलब्ध असून 97 उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी दिली.

मुंबई येथे मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत एस. चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती)(वृत्त व जनसंपर्क) डॉ.राहुल तिडके उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना चोक्कलिंगम म्हणाले, पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत एकूण 97 उमेदवार लढत आहेत. या निवडणूकीसाठी लागणारे साहित्य, साधनसामग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारीवर्ग उपलब्ध आहेत. तसेच पोलीस कर्मचारीवृंद तैनात ठेवण्यात आले आहे. या मनुष्यबळाचे रॅण्डमायझेशन (Randomization) करुन त्यांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

तसेच गडचिरोली मतदारसंघात सात हॅलिकॉप्टर पाठविण्यात आले आहेत. यंत्रणा पूर्ण तयारीनिशी निवडणुकीसाठी सज्ज असून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, असे आवाहन श्री. चोक्कलिंगम यांनी यावेळी केले.

मतदान केंद्र सुरक्षेसह सज्ज –
मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या ईव्हिएम व व्हिव्हिपॅट ची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही रॅण्डमायझेशन (Randomization) झाले आहे. या पाच लोकसभा मतदारसंघामध्ये ईव्हिएम व व्हिव्हिपॅट मशीन्सची विधानसभा मतदारसंघनिहाय कमिशनिंग (Commissioning) करण्यात येत आहे. संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये सीआरपीएफ (CRPF) च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

दिव्यांग व ज्येष्ठांसाठी विशेष सुविधा –
85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये ईटीपीबीएसद्वारे एकूण 9,416 मतदार तर 12डी या अर्जाद्वारे 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग असे एकूण 6,630 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

मतदानाची सर्वसाधारण वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. गडचिरोली-चिमुर (अज) या लोकसभा मतदार संघातील आमगांव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी या चार विधानसभा मतदारसंघात व भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदार संघातील अर्जुनी मोरगांव एका विधानसभा मतदारसंघात अशा एकूण पाच विधानसभा क्षेत्रामध्ये मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे.

मतदानाच्या 48 तास आधी प्रचारास बंदी –
मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी पाचही लोकसभा मतदार संघामध्ये सायलन्स पिरियड (Silence Period) आहे. या लोकसभा क्षेत्रामध्ये 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत.

राज्यातील पहिल्या टप्प्यातील 5 लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी सर्व तयारी झालेली आहे. या पाच लोकसभा मतदार संघातील निवडणूकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी सर्व मतदारांनी पुढे येण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात येत आहे.

मतदान करण्याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन वोटर गाईड देण्यात आले आहे. मतदारांना मतदार वोटर स्लिप उपलब्ध करुन दिल्या आहेत. इपीआयसी (EPIC) व्यतिरिक्त कोणते दस्तऐवज मतदानासाठी वापरता येतील याबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देवून जनजागृती करण्यात आली आहे. आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी मतदान केंद्रे आवश्यक सोयी-सुविधांसह सुसज्ज आहेत.

प्रतिबंधात्मक कारवाई –
कायदा व सुव्यवस्थांतर्गत 11 एप्रिलपर्यंत 43,893 शस्रास्रे जमा करण्यात आलेली आहे. तर परवाने रद्द करून 723 शस्रे जप्त करण्यात आलेली आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी (CRPC) कायद्यांतर्गत 70,967 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

राज्यामध्ये दि. 1 मार्च ते 11 एप्रिल 2024 या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे 39.10 कोटी एकूण रोख रक्कम तर 27.18 कोटी रुपयांची दारु जप्त करण्यात आली. मौल्यवान धातू 63.82 कोटी रुपये, ड्रग्ज 212.82 कोटी, फ्रिबीज 0.47 कोटी आणि इतर बाब अंतर्गत 78.02 कोटी रुपये अशा एकूण 421.41 कोटी रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

18722 तक्रारी निकाली –
16 मार्च ते 13 एप्रिल 2024 या कालावधीत राज्यभरात सी व्हिजील ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या 2337 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील 2331 (99.63%) तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच याकालावधीत एनजीएसपी पोर्टलवरील 19018 तक्रारीपैकी 18722 निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

जाहिरात पूर्व प्रमाणिकरणाचे 54 प्रमाणपत्र वितरित –
राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिध्दीकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणिकरण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडे जाहिरातीच्या पूर्व प्रमाणीकरणासाठी नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने 54 प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहे.

हेही वाचा : हैदराबाद लोकसभा मतदारसंघाचा इतिहास बदलणार? माधवी लता विरूद्ध असुदुद्दिन औवेसी यांच्यात होणार कट्टर लढत

बातमी शेअर करा !
Share
Tags: first phase votingLok Sabha Electionslok sabha elections 2024Maharastra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 16, 2025
Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

June 16, 2025
Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

June 16, 2025
इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

June 16, 2025
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात; सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश | नेमकं काय घडलं?

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात; सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश | नेमकं काय घडलं?

June 15, 2025
“…..यामुळे आमच्या पक्षात येणाचा ओढा वाढतोय”, वाढत्या भाजप प्रवेशावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

“…..यामुळे आमच्या पक्षात येणाचा ओढा वाढतोय”, वाढत्या भाजप प्रवेशावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

June 15, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page