जळगाव, 20 मे : राज्यात गेल्या महिनाभरापासून उन्हाचा पारा वाढला असून जळगाव जिल्ह्याचा पारा 44 अंशावर गेला. दरम्यान, यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमनाची नोंद काल करण्यात आली आहे. तर खान्देशातील नंदुरबाबर 43.6 तर धुळे 42 अंश इतके नोंदवले गेले.
खान्देशात उन्हाच्या झळा –
गेल्या काही दिवसांपासून खान्देशात उन्हाचा पारा वाढला असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांना उन्हाच्या झळा बसत आहेत. दरम्यान, पुढील काही दिवस खान्देशातील तापमान असेच राहणार असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजन कराव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.
पुढील तीन दिवसाचे तापमान –
जळगाव जिल्ह्याचे 21, 22 आणि 23 मे या तीन दिवसाचे तापमान अनुक्रमे 45, 46 आणि 46 अंश सेल्सियस इकते राहणार आहे. तसेच मे महिन्याच्या अखेरीस मान्सुनपुर्व पाऊस पडण्याची देखील शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हेही वाचा : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचवा टप्प्यासाठी आज मतदान, वाचा, प्रमुख लढती एका क्लिकवर