छत्रपती संभाजीनगर, 7 जून : राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असताना समृद्धी महामार्गावर एकापेक्षा एक भीषण अपघाताच्या घटना समोर येत असतात. दरम्यान, समृद्धी महामार्गावर वैजापूर जवळ ट्रक आणि बोलेरो कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर वैजापूर तालुक्यातील जांबरगाव शिवारात स्कॉर्पिओ कार पाठीमागून ट्रकला धडकल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झाले तर चार जण गंभीर झाले आहेत. यामध्ये तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. कुमारी योगेश जाधव (वय 22), कमला बन्सी राठोड (वय 40) आणि बन्सी धोंडीराम राठोड असे या घटनेतील तीन मयतांची नावे आहे.
दरम्यान, अपघातात रामसिंग बलसिंग राठोड, शितल बलसिंग राठोड, मयंक योगेश जाधव आणि नेहा बनसिंग राठोड हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून जखमींवर वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. तसेच त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
हेही वाचा : मोठी बातमी! नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा बनणार पंतप्रधान, शपथविधीची तारीख आणि वेळ ठरली