चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 9 जून : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली आज एनडीए सरकारमधील पंतप्रधान तथा मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यामध्ये नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. दरम्यान, नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात होणाऱ्या या शपथविधी सोहळ्यात खान्देशातून रक्षा खडसेंना संधी देण्यात आली असून त्या मंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
खान्देशातून रक्षा खडसेंना संधी –
एनडीए सरकारमधील पंतप्रधान तथा मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज संध्याकाळी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यात रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
रक्षा खडसे बनल्या तिसऱ्यांदा खासदार –
रक्षा खडसे गेल्या दहा वर्षांपासून रावेर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून नेतृत्व करत आहेत. दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा त्यांनी पराभव केला. यामुळे रक्षा खडसे ह्या तिसऱ्यांदा खासदार बनल्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना केंद्रात मंत्री पद मिळाणार असल्याची माहिती हाती आली आहे.
हेही वाचा : modi 3.0 : पंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधी नरेंद्र मोदी महात्मा गांधींच्या समाधीस्थळी नतमस्तक