चोपडा, 28 जून : चोपडा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने रेशन दुकानदारांनी त्यांच्या विविध मागण्यांबाबत काल चोपड्याचे तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले.
अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रास्त भाव दुकानदारांच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्यांची पूर्तता करुन धान्य वितरणामध्ये येणाऱ्या दैनंदिन अडचणींची सोडवणूक करण्याबाबत काल हे निवेदन देण्यात आले.
निवेदनातील मागण्या –
- स्वस्त धान्य दुकानदार यांना आजचा महागाई निर्देशांकानुसार किमान 100 रूपये प्रति क्विंटल वाढ करावी.
- धान्याचा गोणी कमी भरत असून ते वजन पुर्ण 50 किलो मिळावे.
- प्रत्येक लाभार्थ्यांची ई-केवायसी व मोबाईल सिडींग करण्यासाठी वेळेचे बंधन नसावे ही प्रक्रिया निरंतर सुरू ठेवावी व हे सिडींगचेप्रती सदस्य 50 रुपये शुल्क लाभार्थ्यांकडून वसूल करणेसाठी परवानगी मिळावी.
- रास्त भाव दुकानदारांना प्रलंबित मार्जिन मिळावे व यापुढे दर महिन्याला पाच तारखेपर्यंत नियमित मिळावे.
अशा विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यांची होती उपस्थिती –
या निवेदनावर चोपडा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष विकास पाटील यांच्यासह सर्व स्वस्त धान्य दुकानदारांच्या सह्या आहेत. यावेळी मधूकर राजपूत, दिलीप पालीवाल, ए.डी.कोळी, कांतीलाल चौधरी, संजय पाटील, प्रविण पाटील, रुपेश कोष्टी, राजू तडवी, सरफराज तडवी, योगेश बाविस्कर तसेच महिला बचत गटाच्या मिनाबाई कोळी, मायाबाई महाजन यांच्यासह स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
हेही वाचा : पावसाळी अधिवेशन, अर्थमंत्री अजित पवार मांडणार राज्याचा अर्थसंकल्प, मोठ्या घोषणांची शक्यता