जळगाव, 10 जुलै : राज्यासह जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत दमदार पाऊस झालाय. जिल्ह्यात जळगावसह अमळनेर तसेच पाचोरा तालुक्यात जोरदार पाऊस पडला आहे. तसेच रावेर पारोळा आणि धरणगावत सरसरापेक्षा कमी पाऊस झालाय. दरम्यान, राज्यात पुढील 5 दिवस शनिवार दि.13 जुलैपर्यंत कोकणात अतिजोरदार, विदर्भात जोरदार, तर मराठवाड्यातील तसेच खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीय.
खान्देशसह संपुर्ण राज्यात आतापर्यंत दमदार पाऊस झाला असून खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबारात चांगल्या पावसाची नोंद करण्यात आलीय. तसेच आज सकाळी जळगाव जिल्ह्यातील काही भागात हलक्या स्वरूपात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
काही दिवसांत पावसाची हजेरी लागणार –
जळगाव जिल्ह्यात देखील आतापर्यंत एकूण सरासरीच्या 34 टक्के पाऊस झाला आहे. तर 9 जुलै पर्यंतच्या सरासरीच्या 121 टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत पावसाची हजेरी लागणार आहे. जुलैच्या मध्यानंतर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
हेही वाचा : Special Interview : 7 हजार 200 कोटींचा प्रकल्प; जळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यांना होणार मोठा फायदा