चोपडा, 19 जुलै : चोपडा विधानसभा आदिवासी बहुल असल्याने आदिवासी बांधवांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उत्थानासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी वैजापूर येथे मुलींसाठी साडे चौदा कोटी रुपयांचे वस्तीगृहाच्या भूमिपूजन प्रसंगी केले. आमदार लताताई सोनवणे यांच्या माध्यमातून 534 कोटी रुपयांचा निधी मिळाला असून चोपडा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
काय आहे संपुर्ण बातमी? –
वैजापूर येथील साडे चौदा कोटी रुपयांच्या वसतिगृहाच्या भूमिपूनप्रसंगी शासकीय आश्रम शाळेच्या प्रांगणात काल आयोजित केलेल्या कार्यक्रमात माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सातपुड्याच्या दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या माझ्या आदिवासी बांधवांच्या शिक्षणासाठी उत्तम सोयी उपलब्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या निवासासाठी, अभ्यासाठी, उत्तम दर्जाच्या सोयुनियुक्त वसतिगृहाची निर्मिती तसेच शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून अनेर नदीवर ठिकठिकाणी 21 कोटी रुपयांचे साठवण बंधारे, तर दळणवळणाच्या जलद सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून 210 कोटी रुपयांचे निमगव्हाण ते वैजापुर 33 किमी रस्त्याचे कॉक्रिटीकरण करणे तसेच 208 कोटीचे बुधगांव ते खामखेडा फाटा 28 किमी रस्त्याचे कॉक्रिटीकरण करणे, 10 कोटींचा कजाऀणे ते धवली दरम्यान अनेर नदीवर पुल बांधकाम, वैजापूर येथे 14.50 कोटीची नवीन आश्रमशाळा, तसेच 21 कोटीचा खामखेडा फाटा ते देवझिरीपयऀत रस्ता सुधारणा अशा मोठ्या कामांचा समावेश आहे. दरम्यान, शेतीसाठी बारमाही पाणी उपलब्ध राहील, असे महत्वाकांक्षी प्रकल्प हंड्या कुंड्या धरणाच्या मंजुरीचे काम हे अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी तहसिलदार भाऊसाहेब थोरात, आर. एफ.ओ. समाधान सोनवणे, कावेरी कमलाकर मॅडम, विकास भाऊ पाटील, रावसाहेब पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, शिवराज पाटील, विजय पाटील, किरण देवराज, कैलास बाविस्कर, बबलू पालीवाल, संजय शिरसाट, प्रताप पावरा, लालबाई प्रताप पावरा सरपंच मेलाने, वैजापूर सरपंच दप्तरसिग भाऊ,प्रल्हाद पाडवी सरपंच बोरमळी, धरमसिंग बारेला सरपंच बोराअजंटी, अलका बारेला सरपंच कर्जाने, दिनेश बारेला सरपंच उमर्टी, पंडित कोळी, नाना महाराज नकुल पवरा, बबलु बारेला, लालु बारेला, अनिल पावरा, ताराचंद पाडवी, पी आर माळी सर, कुणाल पाटील, गोपाल चौधरी, गणेश पाटील सचिन महाजन शेटे सर लोकेश काबरा पंडित कोळी, दशरथ बाविस्कर, शाम पाटील, वाल्मीक बाविस्कर सरपंच, गोपाल देवराज, विकास बारेला, संदीप सोनवणे, अरुण बाविस्कर, प्रवीण बाविस्कर, शिवाजी कोळी, सुरेश कोळी, नितीन कोळी, गोपाल पाटील, ज्ञानेश्वर कोळी, शिवलाल भाऊ, गुलाब कोळी, मुकेश कोळी, मुख्याध्यापक एस. आर. देवराज, देविदास पाटील आदी उपस्थित होते.
हेही वाचा : Arun Bhatia Interview : ‘देशात भ्रष्टाचार एक धंदा’, Ex IAS अधिकारी अरुण भाटीया यांची स्फोटक मुलाखत