मुंबई, 25 जुलै : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज मुंबईत मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा केलीय. विधानसभेत कोणतीही युती नाही, असे म्हणत त्यांनी 250 जागा लढवणार असल्याचे सांगितले आहे. तसेच 10 ऑगस्टपासून मी महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहितीही राज ठाकरेंनी दिली.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? –
मुंबईत मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले की, लाडकी भाऊ व बहीण एकत्र राहिले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. माझी सर्वांना विनंती आहे की, जिथे पूर आलाय तिथे लोकांना मदत करा. मूळ महाराष्ट्राचे प्रश्न आहेत, ते आपले निवडणुकीचे मुद्दे असायला हवेत. आपण मुळात धर्माकडे पाहिले पाहिजे. लाकडाचा उपयोग स्मशानात होतोय. यात सुधारणा होणे गरजेचे आहे. काही गोष्टी आपल्याला बदलावे लागेल. ज्यांच्याकडे जंगले आहेत ते लोकं पुरत आहेत. म्हणून राज्य सरकारने विद्युतस्मशान भूमी वाढवल्या पाहिजेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विधानसभेत कुणाशीही युती नाही –
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोक मला सत्तेत काहीही करून बसवायचे आहेत. काही लोक हसतील, पण ती गोष्ट घडणारच आहे. आपण सव्वा दोनशे जागा लढणार आहोत. यासाठी कोणतीही युती होणार नसल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ठ केले. दरम्यान, 1 ऑगस्टपासून मी महाराष्ट्र दौरा करणार असून त्या दौऱ्यात बैठका घेणार आहे आणि त्यामुळे निवडणुकीच्या तयारीला लागा, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
त्यांनाचा तिकिट मिळणार –
राज ठाकरे पुढे म्हणाले की, मी काल आढावा घेत होतो. कळेना कोण कुठे आमदार आहे. पुढे राजकीय घमासान होईल न भविष्य न भूतो असेल. मला कळले आपले लोकं काही कुठे जाणार आहेत तर मीच रेड कार्पेट टाकतो. त्यांचच खरे नाही तर तुम्हाला कुठे बसवतील. आपण सर्व्हे करत आहोत, पक्षातील काही लोकं पाठवून. पहिला सर्व्हे झाला, आता पुढे तुम्हाला येऊन भेटतील आणि तुमच्या इथली परिस्थिती त्यांना सांगा. ज्यांची निवडुन येण्याची परिस्थिती असेल त्यालाच तिकीट मिळेल.