• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात शहीद स्मारकं उभे करणार; पालकमंत्र्यांची घोषणा, आमदार किशोर पाटील यांच्या मागणीनंतर ठराव मंजूर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 25, 2024
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगाव जिल्ह्यात शहीद स्मारकं उभे करणार; पालकमंत्र्यांची घोषणा, आमदार किशोर पाटील यांच्या मागणीनंतर ठराव मंजूर

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

जळगाव, 25 जुलै : जळगाव जिल्ह्यातील ज्या ज्या गावातील जवान शहीद झाले आहेत, त्या त्या गावात शहीद स्मारक उभारण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. तसेच लवकरच त्याबाबत नियोजन केले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. जळगाव जिल्हा नियोजन समितीची आज बैठक पार पडली. या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

आमदार किशोर पाटील यांची मागणी अन् ठराव मंजूर –
जवान शहीद झाल्यानंतर त्या जवानाचे स्मारक व्हावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडे केली जाते. दरम्यान, या पंचवार्षिकची ही शेवटची मिटिंग असून सुमारे 650 कोटींचा आपला बजेट आहे. या पार्श्वभूमीवर माझी येथे उपस्थित असलेल्या सर्वांसह अध्यक्षांना विनंती आहे की, शहीद जवानांच्या स्मारकासाठी निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी केली.

दरम्यान, या मागणीवरून जळगाव जिल्ह्यातील ज्या ज्या गावातील जवान शहीद झाले आहेत, त्या त्या गावात शहीद स्मारक उभारण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.

बैठकीला यांची होती उपस्थिती –
जिल्हा नियोजन समितीच्या नुतन सभागृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आ. चिमणराव पाटील, आ. शिरीष चौधरी, आ. चंद्रकांत पाटील, आ. किशोर पाटील, आ. मंगेश चव्हाण, आ. सुरेश भोळे, आ. लता सोनावणे, सर्व अशासकीय सदस्य, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकीत, प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती वेवोतोलु केजो, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हा नियोजन अधिकारी, विजय शिंदे, यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा : “….तर गोरगरीब जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही,” पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newsminister gulabrao patilmla kishor appa patilsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Breaking! भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ चार जणांना मिळाली उमेदवारी

Breaking! भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ चार जणांना मिळाली उमेदवारी

March 4, 2026
युद्धपरिस्थितीचा परिणाम; अडकलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने उचलली मोठी पावले, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

युद्धपरिस्थितीचा परिणाम; अडकलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने उचलली मोठी पावले, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

March 4, 2026
इराण-इस्रायल युद्ध; भारताकडे किती दिवसांचा इंधन साठा शिल्लक?, केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती

इराण-इस्रायल युद्ध; भारताकडे किती दिवसांचा इंधन साठा शिल्लक?, केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती

March 4, 2026
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

March 4, 2026
जाहिरातीतून एसटी कमविणार 250 कोटी रुपये; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

जाहिरातीतून एसटी कमविणार 250 कोटी रुपये; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

March 3, 2026
भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

March 3, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page