• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मुलींकडून शिक्षणासाठी फी घेतल्यास महाविद्यालयांवर कारवाई, ‘अशी’ घेतली जाणार तक्रारीची दखल, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 26, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
मुलींकडून शिक्षणासाठी फी घेतल्यास महाविद्यालयांवर कारवाई, ‘अशी’ घेतली जाणार तक्रारीची दखल, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती

मुंबई, 26 जुलै : महाराष्ट्र विधिमंडळाच्या यंदाच्या पावसाळी अधिवेशनात मुलींना मोफत शिक्षण योजनेची घोषणा करण्यात आली होती. या अंतर्गत राज्यातील 642 व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क 100 टक्के माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काय म्हणाले मंत्री चंद्रकांत पाटील? –
मुलींच्या मोफत शिक्षणासाठी सरकारकडून रकमेची प्रतिपूर्ती शिक्षणसंस्थांना केली जाणार आहे. त्यामुळे हे शुल्क न घेता विद्यार्थिनींना प्रवेश द्यावा. मात्र, जे शुल्कासाठी आग्रह धरतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. ‘शिक्षण सर्वांसाठी, समृद्ध महाराष्ट्रा’साठी याअंतर्गत गुरुवारी (दि. २५) वेबीनारच्या माध्यमातून विद्यार्थिनी, पालक व संस्था प्रतिनिधी यांच्याशी शासन निर्णय आणि विविध शिष्यवृत्ती योजना याविषयी संवाद साधताना चंद्रकांत पाटील बोलत होते.

‘अशी’ घेतली जाणार तक्रारीची दखल –
कोणत्याही विद्यार्थिनीला 100 टक्के शुल्क माफीबाबत समस्या आली, तर विभागाच्या संकेतस्थळावर तक्रार करावी किंवा माझ्या मोबाइल क्रमांकावर एका ओळीत समस्या मांडणारा एसएमएस केला, तरी त्याचीही दखल घेतली जाईल. असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

विद्यार्थिनींच्या कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी –
मंत्री चंद्रकांत पाटील पुढे बोलतना म्हणाले की, संस्थांना सप्टेंबर आणि फेब्रुवारी/मार्च अशा दोन टप्प्यांत शुल्कमाफीची प्रतिपूर्ती केली जाणार आहे. तोपर्यंत त्यांनी नोडल अधिकारी नेमून विद्यार्थिनींच्या कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी. लॉगइन तयार करून, त्यांना पात्र करावे. दरम्यान, उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे निधी शिल्लक आहे. दि. 30 सप्टेंबरला रकमेबाबत दावा (क्लेम) सादर करा. त्याची लगेच प्रतिपूर्ती करू. राष्ट्रीय बँकांशी बोलणे झाले आहे. त्या विनातारण कर्ज संस्थांना देण्यास तयार आहेत. त्यावर व्याजदर कमी असेल. त्याच खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा होईल. सरकारची आर्थिक स्थिती बदललेल, त्यानुसार भविष्यात संस्थांना व्याज भरावे लागणार नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

6 हजार शैक्षणिक संस्था सहभागी –
या वेबिनारमध्ये संपूर्ण राज्यातून जवळपास 6 हजार शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या होत्या. तसेच, 47 हजार 247 डिव्हाईस ऑनलाइन कनेक्ट झाले होते. तर, 52 हजार 432 युट्यूबर विद्यार्थी, पालक कनेक्ट होते. यामध्ये जवळपास 5 हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी फीडबॅक नोंदवला आहे. अनेक महाविद्यालयामध्ये एलईडी स्क्रीन लावून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. जवळपास 15 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी या ऑनलाईन संवादामध्ये सहभागी झाले होते. तसेच इतर मागास वर्ग व बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, इतर मागास वर्ग व बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव विनया सिंघल, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांची या वेबिनारमध्ये उपस्थित होती.

हेही वाचा : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाचा जीआर निघाला, पाच वर्ष मोफत वीज 

बातमी शेअर करा !
Share
Tags: free educationlatest newsminister chandrakant patilsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page