मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 27 जुलै : चोपडा येथे श्री. संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कीर्तन सोहळाचे आयोजन करण्यात आले आहे. चोपड्यातील माळी समाज मंगल कार्यालयात दिनांक 30 जुलै मंगळवार रोजी संत सावता महाराज यांची स्थापना होणार आहे. या दिवसापासून किर्तन सप्ताहाला सुरूवात होणार आहे.
कीर्तन सप्ताहाचे असे आयोजन –
30 जुलै – मंगळवार – ह.भ.प. भानुदास महाराज भुसावलकर
31 जुलै – बुधवार – ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पुनगावकर
1 ऑगस्ट – गुरूवार – ह.भ.प. महेश महाराज चिखलीकर ह.मु.एकलग्न
2 ऑगस्ट – शुक्रवार – ह.भ.प. गजानन महाराज पारोळेकर
3 ऑगस्ट – शनिवार – सकाळी काल्याचे किर्तन – ह.भ.प. योगेश महाराज वाघाडीकर
महाप्रसादाचा कार्यक्रम –
या सर्व महाराजांचे कीर्तनाचा लाभ चोपडा शहरवासियांना मिळणार आहे. दैनंदिन पाच ते सहा काकड आरती होणार असून त्याचबरोबर संध्याकाळी हरिपाठ होणार आहे. तसेच शेवटच्या दिवशी म्हणजे 3 ऑगस्ट रोजी सात ते आठ हजार भाविक भक्तगण तसेच सर्व समाज बांधवांसाठी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी संध्याकाळी पालखी मिरवणूक शहरातून निघणार आहे. दरम्यान, पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी कीर्तन श्रवणाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन फुलमाळी समाज पंच मंडळ व समस्त फुल माळी समाज बांधवच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा : श्रमिक आधार पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत दुसाने यांची नियुक्ती