नवी दिल्ली, 5 ऑगस्ट : खोटी प्रमाणपत्रांचा मुद्दा समोर आल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून पूजा खेडकर यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली. यामध्ये त्यांचे आयएएस पद रद्द करण्यात आले असून त्यांना भविष्यात कुठलीही परिक्षा देता येणार नसल्याचे युपीएससीकडून सांगण्यात आले. दरम्यान, पूजा खेडकरने यूपीएससीच्या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) पूजा खेडकर यांच्यावर मोठी कारवाई करत त्यांचे आयएएस पद रद्द करण्यात आले आहे. यूपीएससीने पूजा खेडकरची उमेदवारी रद्द केली होती. तसेच त्यांना शो कॉज नोटीस बजावली होती. दरम्यान, युपीएससीच्या याच निर्णयाविरोधात पूजा खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली असून यांसंदर्भातील याचिका त्यांनी दाखल केली आहे.
युपीएससीने केलीय मोठी कारवाई –
यूपीएससीने पूजा खेडकरला दोषी ठरवत पूजा मनोरमा दिलीप खेडकरची उमेदवारी रद्द करण्यात आली. तसेच यूपीएससीने भविष्यातील सर्व परीक्षा/निवडींमधून पूजा खेडकरला कायमचे काढून टाकले. युपीएससीकडून पूजा खेडकरला 30 जुलैपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यांचे उत्तर न मिळाल्याने यूपीएससीने ही कारवाई केली आहे. दरम्यान, युपीएससीच्या याच निर्णयाविरोधात पूजा खेडकरने याचिका दाखल केली आहे.
हेही वाचा : Arun Bhatia Interview : ‘देशात भ्रष्टाचार एक धंदा’, Ex IAS अधिकारी अरुण भाटीया यांची स्फोटक मुलाखत